स. म. शिवाजीराव नागवडे सह. साखर कारखाना चेअरमन पदी राजेंद्र नागवडे यांची फेरनिवड तर व्हाईस चेअरमन पदी बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड
By : Polticalface Team ,Tue Jan 25 2022 14:35:09 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा(प्रतिनिधी):-सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह. साखर कारखाना चेअरमन पदी राजेंद्र नागवडे यांची फेरनिवड तर व्हाईस चेअरमन पदी जि. प.माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन पदासाठी राजेंद्र नागवडे यांच्या नावाची सूचना सावता हिरवे यांनी मांडली तर शरद जगताप यांनी अनुमोदन दिले
व्हाईस चेअरमन पदासाठी बाबासाहेब भोस यांच्या नावाची सूचना प्रशांत दरेकर यांनी मांडली तर भाऊसाहेब नेटके यांनी अनुमोदन दिले.
मंगळवार दि.२५ जानेवारी रोजी दुपारी कारखाना विश्रामगृहा वर नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली होऊन वरील निवड जाहीर करण्यात आली.
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची २१ जागांसाठी दिनांक १४ जानेवारी रोजी झाली होती त्यात विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली किसान क्रांती पॅनेलने सर्व २१ जागा अडीच ते तीन हजार मताधिक्यानी जिंकल्या
नूतन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचे सभासदांनी अभिनंदन केले आहे.
निवडीनंतर बोलताना चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले मागील काळात आम्ही स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या पावलावरपाऊल ठेवत सभासद हिताचा कारभार केला यावर सभासदांनी निवडणुकीतून शिक्कामोर्तब केले भविष्यातही चांगला कारभार करून दिलेले आश्वसन देखील पूर्ण करू
५वेळा संचालक पदी विजयी झालेते सुभाष शिंदे यांनी बोलताना आपण व्हाईस चेअरमन पदासाठी इच्छुक होतो पण आपण सर्व निर्णय राजेंद्र नागवडे यांच्या वर सोपवला असे सांगून आपण थांबलो असे स्पष्ट केले
वाचक क्रमांक :