विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे हे महाविद्यालय म्हणजे मिनी विद्यापीठच- शेख, दिवाणी न्यायाधीश
By : Polticalface Team ,Tue Jan 25 2022 20:02:48 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. आय. शेख यांनी बाबुजी आव्हाड महाविद्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या सुविधांची माहिती घेतली.
यावेळी त्यांनी ग्रंथालयास तसेच इनडोअर स्टेडीयमला भेट देऊन या विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सेवांबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी महाविद्यालयामार्फत पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी त्यांचा सत्कार केला.
ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागवून विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणारे हे महाविद्यालय म्हणजे मिनी विद्यापीठच आहे, असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
यावेळी बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. अंबादास खेडकर, उपाध्यक्ष ॲड. सचिन बटुळे, ॲड. अमोल पालवे, ॲड. नितीन वायभासे, अमोल सोनटक्के आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शेखर ससाणे यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी मानले.
वाचक क्रमांक :