By : Polticalface Team ,Wed Jan 26 2022 11:33:15 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी प्रतिनिधी: मतदार हा राजा असतो.त्याने निवडलेला लोकप्रतिनिधी कार्यक्षम असला पाहिजे. प्रत्येकाच्या स्वातंत्र्याला न्याय देण्यासाठी मतदाराने बजावलेली भूमिका ही फार महत्त्वाची असते.मतदार जागरूक असेल तरच आपण विकासाच्या दिशेने जाऊ शकतो. मतदारामुळे लोकशाही बलवान होऊ शकते.असे प्रा.डॉ.भगवान वाघमारे म्हणाले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन कार्यक्रम घेण्यात आला.प्रा.डॉ.रमेश भारुडकर यांनी अतिथी म्हणून आपले विचार मांडले.प्रा.जे.एम.पठाण यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी भूमिका बजावली.उपप्राचार्य अविनाश कंदले, प्रा.अशोक भोगाडे उपस्थित होते.डॉ.सुहास गोपने यांनी आभार मानले.
वाचक क्रमांक :