शरद पवार लवकर बरे होवे म्हणून यूगेंद्र पवार व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जावळे यांचे युगेद्र पवार युवा मंच च्या वतीने पंढरपूर च्या पांडुरंगाला घातले साकडे
By : Polticalface Team ,Wed Jan 26 2022 16:06:48 GMT+0530 (India Standard Time)
पंढरपूर:राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये नियमावलींचे पालन करुन घरातच राहणे पसंत केले होते. त्यानंतर, राज्यात मिशन बिगेन अगेन सुरू झाल्यानंतर त्यांनी हळूहळू राज्यात सक्रीयपणे सहभाग घेत आपले दौरे केले. सुदैवाने कोरोनापासून ते दूर होते, पण तिसऱ्या लाटेत आता त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेक नेत्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी, ओमायक्रॉनचा धोका असल्याने खरबदारी म्हणून कोरोना नियमावली व निर्बंध आणखी कडक करण्यात आले. तिसऱ्या लाटेत अनेकांना कोरोनाची लागण झाली, पण बेडची गरज किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली नाही. त्यामुळे,विलिगीकरणात राहूनचा कोरोनावर नेतेमंडळींनीही मात केली आहे. आता, शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली. या नंतर युगेंद्र पवार युवा मंच च्या वतीने शरद पवार हे लवकर बरे होवे म्हणून पंढरपूर च्या विठ्ठला साकडे घातले यावेळी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जावळे गुंडेगाव. रितेश गायकवाड बारामती. वीर काका बारामती. योगेश देशमुख पंढरपूर नूरजहा सय्यद सातारा तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते उपस्तित होते
यावेळी पंढरपूर देवस्थान च्या वतीने युगेंद्र दादा पवार यांचा सत्कार करण्यात आला
वाचक क्रमांक :