संविधान संसाधन केंद्राचे दिमाखदार उद्घाटन दिग्गजांनी घेतला सेल्फी वीथ संविधान उपक्रमात सहभाग
By : Polticalface Team ,Thu Jan 27 2022 15:03:01 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा :प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीगोंदा तालुक्यातील संविधानास मानणाऱ्या आणि संविधान समजून घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी लोकशिक्षण प्रतिष्ठान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित “संविधान संसाधन केंद्र” उद्घाटन माजी मंत्री , विद्यमान आमदार बबनराव (दादा) पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अनुराधा (ताई) नागवडे, श्रीगोंदा तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब,माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक व गटनेते मनोहर (दादा) पोटे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळकजी भोस,मानवी हक्क अभियानचे जिल्ह्यध्यक्ष राजेंद्रजी काळे यांनी या कार्यालयास भेट देऊन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम आण्णा शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी फोन करुन शुभेच्छा देत उपक्रम समजून घेत भविष्यात संविधानीक मुल्यांच्या जागृती साठी सर्वोतोपरी सहयोग देणार असल्याचे सांगितले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांसाठी लोकशिक्षण प्रतिष्ठान आणि संविधान प्रचारक लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सेल्फी वीथ संविधान उपक्रम तसेच “आम्ही भारताचे लोक” या विषयावर पोस्टर प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते यावेळी दिग्गजांनी हजेरी लावत संविधानाबाबत सविस्तर माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन पाहण्यासाठी व सेल्फी वीथ संविधान उपक्रमात सहभागी होण्यासाठी हजेरी लावली.
या उपक्रमाबाबत सांगताना लोकशिक्षण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद काळे म्हणाले की आज संविधानाबाबत नागरीकांच्या मनामध्ये अनेक समज गैरसमज आहेत ते दुर करणे, नागरीकांमध्ये संविधानीक मुल्ये रुजविणे,नागरीकांना संविधानाने बहाल केलेले मुलभूत अधिकार आणि कर्तव्ये याबाबत साक्षर बनविणे, विविध समाजघटकांतील नागरीकांना संविधानाबाबत समज वाढविण्यासाठी प्रशिक्षण देणे,प्रशिक्षीत नागरीकांच्या सहयोगाने श्रीगोंदा तालुक्यातीत गावांमधील नागरीकांना संविधानीक मुल्यांबाबत साक्षर बनविने आणि नागरीकांमध्ये बंधुता हे मुल्य रुजविणे हा संविधान संसाधन केंद्राचा उद्देश असल्याचे काळे यांनी सांगितले.
यावेळी श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक राजू लोखंडे,समीर बोरा गुलाब खेंडके, गणेश भोस, सतीश मखरे,नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बंडुतात्या जगताप, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप नागवडे, बाळासाहेब महाडीक,युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल साळवे, संभाजी ब्रिगेडचे माजी तालुकाध्यक्ष अरविंद कापसे, थिंक ब्रॅंडेडचे अवधुत राऊत,आर पी आय चे तालुकाध्यक्ष जीवाजीराव घोडके, पॅंथर सेनेचे अमर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे तालुका कार्याध्यक्ष गोरख घोडके,बारा बलुतेदार महासंघाचे तालुकाध्यक्ष कांतीलाल कोकाटे,खादी ग्रामोद्योगचे माजी चेअरमन नंदु ससाने, सामाजिक कार्यकर्ते गांधी साहेब, आदिवासी पारधी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित भोसले, चंद्रकांत काळे, अतुल चव्हण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यासाठी संविधान प्रचारक सतिष ओहोळ सर, मिराताई शिंदे, अविनाश घोडके,नितीन घोडके, संतोष भोसले,छाया भोसले,लता सावंत, लोकशिक्षण प्रतिष्ठानचे तज्ञ संचालक राजेंद्र राऊत,मयुर भोसले, दिगंबर काळे,विजय भोसले यांनी परीश्रम घेतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.