सायबर गुन्हेगारीचा नवीन प्रकार चक्क माजी आमदार राहुल जगताप यांचे फेक फेसबुकचे अकाउंट बनवून पैशाची मागणी , सायबर क्राईम मध्ये तक्रार.
By : Polticalface Team ,Fri Jan 28 2022 18:04:50 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा प्रतिनिधी :-
श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुलदादा जगताप यांचे सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट नवीन तयार करून त्यावरून अनेक जणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मला हॉस्पिटल साठी आठ हजार रुपयांची गरज आहे अशा प्रकारचे मेसेज पाठवण्यात आले या प्रकरणी सायबर क्राईम अहमदनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मधील माजी आमदार व कुकडी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन तसेच जिल्हा बॅंकेचे संचालक यांचा सोशल मीडियाचे फेसबूक अकाउंट अज्ञात इसमाने नवीन डमी अकाउंट तयार करून त्या अकाऊंटवरून अनेकांना पैशाची मागणी केल्याचा प्रकार घडला असून याबाबत याविषयी माजी आमदार राहुलदादा जगताप यांचे स्वीय सहाय्यक खंडू पवार,राहुल दादा जगताप यांचे बंधू कालिदास जगताप यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच अनेकांना फोन करून व्हाट्सअप वर याची बातमी शेअर करून अनेकांपर्यंत अकाउंट हॅक झाल्याची माहिती कळवली.
ही माहिती श्रीगोंदा तालुक्यातील अनेक व्हाट्सअप ग्रुप वरती स्टेटस वरती पसरल्यामुळे राहुलदादा जगताप यांच्या समर्थकांना या विषयी माहिती समजण्यास सोयीस्कर झाले.
लोकांना वेगवेगळ्या खात्यावरून मॅसेज जाऊन पैश्याची मागणी होत होती मग त्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी याबाबत अहमदनगर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर क्राइम या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
वाचक क्रमांक :