युगेंद्र दादा पवार युवा मंचा च्या वतीने ई श्रम कार्ड मोफत बनवून देण्याचा शुभारंभ दादासाहेब जावळे यांच्या हस्ते संपन्न
By : Polticalface Team ,Tue Feb 01 2022 14:46:55 GMT+0530 (India Standard Time)
अहमदनगर: केंद्रीय श्रम मंत्रालयाने एक महत्त्वाची घोषणा केली असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या आकडेवारीची माहिती होण्यासाठी केंद्र सरकारनं ई-श्रम पोर्टल लाँच केलं होतं. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ही योजना सर्वसामान्य लोकांना फायदा होवा म्हणून कार्यरत केली असून आता या योजनेचा फायदा गरीब व गरजूना मिळवा व ही योजना सर्वसामान्य पर्यत पोहचावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील एक सर्वपरिचित सामाजिक युगेंद्र दादा पवार युवा मंच ने जबाबदारी घेतली असून याचा शुभारंभ मंगळवार दि 1 फेब्रुवारी 2022 रोजी अहमदनगर ज़िल्ह्यातून दादासाहेब जावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला
ई-श्रम कार्ड देशभरात स्वीकारार्ह असेल. नोंदणीनंतर कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होईल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास १ लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभणार आहे. त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत. ई-श्रम पोर्टलवर शेतकरी नोंदणी करू शकणार की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या ठिकाणी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करू शकतात. सधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही.
युगेंद्र दादा पवार युवा मंच महाराष्ट्र राज्याच्या वतीने ही योजना मोफत राबविण्यात येणार असल्याची माहिती युगेंद्र दादा पवार युवा मंच महाराष्ट्र राज्याचे चे प्रमुख युगेंद्र पवार यांनी सांगितले
अनेक महिला बचत गटांच्या महिलांनी लाभ घेतला यावेळी सविता खोमणे, अंकिता उबाले,कोमल सपकाळ यांच्या सह गावातील मान्यवर उपस्थितीत होते
वाचक क्रमांक :