संस्थानिके ताब्यात घेण्यासाठी सहकार क्षेत्राचा पाया शिवसैनिकांनी भक्कम करावा - प्रदिपकुमार खोपडे
By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 17:56:51 GMT+0530 (India Standard Time)
बीड (प्रतिनिधी) :- बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने नुकतीच शिव सहकार सेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिव सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष मा.प्रदीपकुमार खोपडे साहेब यांनी मार्गदर्शन केले. विना सहकार नाही उद्धार,सहकाराचा पाया मजबूत असेल तर छोटे छोटे संस्थानिके,ताब्यात घेण्याची ताकद निश्चित शिवसैनिकात निर्माण होईल,यासाठी येणाऱ्या काळात काळजीपूर्वक लक्ष देण्याचा मोलाचा सल्ला प्रदीपकुमार खोपडे यांनी शिवसैनिकांना दिला.
सेवा सहकारी सोसायटी,बचतगट,पतसंस्था दूध संघ, मध्यवर्ती बँका, बाजार समित्या, यासारख्या विविध सहकारी संस्था केवळ गांभीर्याने न घेतल्यामुळे शिवसैनीकाच्या हातून निसटतात हीच बाब लक्षात घेऊन मा.पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब यांनी शिवसेना पक्ष सहकार क्षेत्रात वाढविण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना सन्माननीय नेते मराठवाडा संपर्क प्रमुख चंद्रकांतजी खैरे साहेब, उपनेते तथा मराठवाडा विभागीय समन्वयक मा. विश्वनाथजी नेरूरकर साहेब व शिव सहकार सेनेच्या राज्य प्रमुख सन्माननीय शिल्पाताई सरपोतदार यांनी सबंध महाराष्ट्रात शिवसैनिकांना सहकाराचे महत्त्व जाणीव करून देण्यासाठी शिव सहकार सेनेची स्थापना केली असल्याचे प्रदीपकुमार खोपडे यांनी सांगितले.
सहकार क्षेत्रातले बारकावे माहित नसल्यामुळे व योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे केवळ विशिष्ट वर्गाची मक्तेदारी वाढत गेली.शिवसेनेच्या नवीन सहकारसेनेच्या शाखेच्या माध्यमातून ही पोकळी भरून काढण्याचे काम निश्चित केले जाईल असे यावेळी मनोगत करताना शिवसेना मा.जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी सांगितले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनीही आपले विचार मांडले,तसेच जिल्हा पदाधिकारी,उप जिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख यांनी आपले मत व्यक्त करून सहकाराला बळकटी देण्याचा माणसं निर्माण केला.
यावेळी बैठकीस शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक,माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे,माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे,किसान सेना जिल्हा संघटक परमेश्वर सातपुते, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक संगिता चव्हाण,न.प.माजी सभापती सुनिल अनभुले, जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उप जिल्हाप्रमुख गणेश वरेकर,मा.तालुका प्रमुख उल्हास गिराम,युवासेना जिल्हाधिकारी सागर बहिर,अभिजीत बरिदे,शुभम डाके,उप जिल्हा प्रमुख रामराजे सोळंके, गेवराई तालुका प्रमुख कालिदास नवले,वडवणीचे मा.तालुका प्रमुख विनायक मुळे,नगरसेवक संजय उडाण, शिवसेना विधानसभा मतदारसंघ प्रमुख सामना तालुका प्रतिनिधी आजिनाथ खेडकर,किरण चव्हाण,रत्नाकर शिंदे,गोरख सिंघण,संदीप माने,सुशील पिंगळे,रामदास ढगे,शिक्षक सेनेचे बहिरवाळ सर,सुधीर शिंदे,किसन कदम,साहेबराव पोपळे,पंकज कुटे,सुनील सुरवसे, प्रदीप माने,प्रदीप कोटुळे,नानासाहेब घाल्लाळ,उध्दव काकडे,नवनाथ शिंदे, बंटी धनवे,राजेश मोरे,महादेव आंधळे,सचिन धपाटे,मुकेश शिवगण,अक्षय काशीद,अरुण भोसले,गणेश जाधव,बंडू मामा जाधव,सूर्यकांत जगताप यांच्यासह सर्व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह ही शिव सहकार सेनेची आढावा बैठक पार पडली यावेळी शिवसेना,युवासेना पदाधिकारी,महिला आघाडी पदाधिकारी,शिवसेनेच्या सर्व अंगीकृत व अधिकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक सेनेचे बहीरवाळ सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन गणेशजी जाधव यांनी व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी