आमदार संजय जगताप यांचे वडगाव निंबाळकर येथे बहुजन हक्क परिषद च्या वतीने जंगी स्वागत
By : Polticalface Team ,Wed Feb 23 2022 11:13:28 GMT+0530 (India Standard Time)
वडगाव निंबाळकर( ता. बारामती) येथे पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांचे वडगाव निंबाळकर येथील होळ चौक येथे बहुजन हक्क परिषद यांच्या वतीने येथे जंगी स्वागत करण्यात आले. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वडगाव निंबाळकर येथून जात असतान त्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै.नानासाहेब मदने, वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचे सदस्य राहुल आगम,को-हाळे खुर्द ग्रामपंचायतीचे कर्तव्य दक्ष व लोकप्रिय सदस्य सुरज खोमणे सामाजिक कार्यकर्ते किशोर(भाऊ)आगम ,भटक्या विभक्त जातीच्या पश्चिम महाराष्ट्राचे युवक अध्यक्ष नागेश जाधव,नंदुशेठ जाधव खराडे कंट्रशनचे मालक सतिश खराडे ,पुष्कराज गायकवाड ,अनिल खुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरज खोमणे यांनी केले तर आभार नानासाहेब मदने यांनी मानले.
वाचक क्रमांक :