काष्टी येथे दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयांचा माल केला गायब
By : Polticalface Team ,Fri Feb 25 2022 11:59:11 GMT+0530 (India Standard Time)
प्रतिनीधी श्रीगोंदे :तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवर असणाऱ्या व्यापारी गाळेधारकांची आज पहाटे च्या सुमारास सात दुकानांचे शटर तोडून चोरट्यांनी हजारो रुपयेचा माल गायब केल्याने गावातील व्यापारी वर्गात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
सविस्तर माहिती अशी दि.२४ रोजीच्या पहाटे तीनच्या सुमारास गावातील अजनुज चौकातील राकेश पाचपुते यांची समृध्दी सहकारी पतसंस्था, शेजारी साईसेवा संस्थेचे उपाध्यक्ष यांचे साई सुपर मार्केट, विजय रंधवे यांचे इलेक्ट्रिक गोडावून, फोडून काही वस्तु तर ड्रावर मधून किरकोळ रक्कम चोरीला गेली तर छत्रपती शिवाजी उपबाजार समितीच्या आवारातील मार्केटच्या गाळ्यामध्ये जेथे श्रीगोंदे पोलिस स्टेशनची चौकी गावाचे रक्षण करते त्याच्या शेजारचे अमोल दातीर यांचे गुरुदत्त पेंटचे दुकान फोडून दहा हजार रोख रक्कम व चांदीचे वीस क्वाईन व दोन गोल्डन क्वाईन चोरीला गेले. शेजारी संदिप कळसकर यांचे तन्वी गिप्ट गॕलरी हाऊस, सुरेश काळे यांचे एस.के.अॕग्रोसेल्स, तसेच माजी सभापती अरुणराव पाचपुते यांचे लता मेडीकल फोडून हात साफ करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला असून यामध्ये सात दुकानाचे कटावनीच्या साह्याने शटर तोडून फक्त रोख रक्कम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये काही ठराविक दुकानदारांची मिळून काही हजारात रक्कम तर काही महागड्या वस्तु चोरीला गेल्या आहेत. दोन वर्षे झाले कौरोनामुळे व्यवसाय कमी त्यात चोरी ज्या ठिकाणी चोरी झाली तो सर्व भाग काष्टी पोलिस चौकीच्या शेजारी आहे. चौकीजवळ उभे राहीले तरी फोडलेली सर्व दुकाने दिसतात अशी परिस्थिती असणाता चार ते पाच चोरट्याच्या टोळीने हे सर्व दुकाने फोडली आहेत. कारण येथील एका दुकानातील सी.सी.टीव्ही कॕमेऱ्या मध्ये चोरटे कैद झाले असून ते स्पस्ट दिसत आहेत. घटने नंतर पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटस्थळी येवून पाहाणी करुण सर्व दुकानदार यांच्या गेलेल्या मालाची व रक्कमेचा पंचनामा करुण पुढील तपास सुरु केला आहे.
वाचक क्रमांक :