शेतकऱ्यांचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर देवकातेची उंच भरारी ..... प्रकाश भैय्या सोनसळे
By : Polticalface Team ,Fri Mar 11 2022 23:27:18 GMT+0530 (India Standard Time)
बीड प्रतिनिधी
बीड तालुक्यातील शिदोड येथील एक शेतकरी नंदलाल देवकाते,चंद्रकला देवकाते यांचा मुलगा ज्ञानेश्वर नंदलाल देवकाते याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे या यशामुळे त्यांचे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) होण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून त्याच्या यशाबद्दल अखंड महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाच्या शुभेच्छांचा वर्षाव ज्ञानेश्वर देवकाते यांच्यावर होत आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०१९ पोलीस उपनिरीक्षक पदाची पीएसआय सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत बीड तालुक्यातील शिदोड या गावचा ज्ञानेश्वर नंदलाल देवकाते हा पोलिस उपनिरीक्षक पद हे मिळवलं आहे ज्ञानेश्वर याने १ली ते १०वी हे शिक्षण शिदोड येथे घेतले ११वी १५ वी हे शिक्षण बलभिम महाविद्यालय बीड येथे घेतले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदासाठी २०१९ च्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवले.
शिदोड येथे आई-वडील अशा जेमतेम भाऊ बहिण चुलते आहेत देवकाते कुटुंब आहे अनेक वर्षापासून शेती हा व्यवसाय आहे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबात स्वतः वडील शेतकरी असूनही त्यांनी कधी आपल्या मुलाला कधीच कमी पडून दिलं नाही आज एका शेतकरी यांचा मुलगा जर पीएसआय होऊ शकतो तर आपल्या सुशिक्षित घराण्यातली मुले मोठमोठ्या पदावर गेले पाहिजेत.
आज शिदोड येथे गावकऱ्यांनी ज्ञानेश्वर देवकाते यांची पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली होती व त्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमास उपस्थित राहुन मा.प्रकाश भैय्या सोनसळे यांनी बोलताना सांगितले ज्ञानेश्वर देवकाते याने आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले आहे ज्ञानेश्वर याने उंच भरारी घेतली आहे यासाठी यश संपादन केले पाहिजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा.
यावेळी गावचे सरपंच व उपसरपंच सदस्य पंचक्रोशीतील सर्व नागरिक नातेवाईक माता भगिनी आदी मान्यवर उपस्थित
ज्ञानेश्वर यांना अखंड महाराष्ट्रातील धनगर समाज यांच्या कडून फोनवरून शुभेच्छा देण्यात येत आहेत
वाचक क्रमांक :