नैतिकता आणि सहकाराची सांगड घालून सहकारात निकोप स्पर्धा होऊन लोकांना सहकारातून समृद्धी घडविण्याची गरज - सहकार आयुक्त अनिल कवडे

By : Polticalface Team ,Fri Mar 18 2022 14:30:00 GMT+0530 (India Standard Time)

नैतिकता आणि सहकाराची सांगड घालून सहकारात निकोप स्पर्धा होऊन लोकांना सहकारातून समृद्धी घडविण्याची गरज - सहकार आयुक्त अनिल कवडे श्रीगोंदा(प्रतिनिधी):-नैतिकता आणि सहकाराची सांगड घालून सहकारात निकोप स्पर्धा होऊन लोकांना सहकारातून समृद्धी घडविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी पुणे येथे राष्ट्रीय सहकारी विकास निगम दिल्ली वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट सहकार पुरस्कार श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीला देताना आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. आर्थिक क्षेत्रात गेल्या १० वर्षात विठ्ठल राव वाडगे यांनी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी मार्फत विविध कर्ज योजना,बचत गटांना कर्जवाटप शिवाय बँकिंग क्षेत्रात उत्पन्न वाढीचे विविध मार्ग शोधून तसेच सामाजिक उपक्रम राबवून आदर्श निर्माण केल्याबद्दल मानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट सोसायटी ला जाहीर झाला. पुरस्कार विठ्ठलराव वाडगे पा. यांना बुधवारी सहकार आयुक्त अनिल कवडे,राज्य सहकारी विकास महामंडळा चे लेफ्टनंट कर्नल विनीत नारायण, डॉ.अभय देशपांडे ,नाबार्ड चे जि.एस.रावत यांच्या हस्ते पुणे येथे एका सोहळ्यात देण्यात आला त्यावेळी कवडे बोलत होते. श्री.कवडे पुढे म्हणाले राज्यात सहकारात क्रांती झाली त्याचे जतन करण्याची गरज आहे.सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढण्यासाठी नव्या कार्यकर्त्यांनी पुढे येण्याची गरज आहे त्यातून सहकार रुजेल लोकांना फायदा होईल तर लेफ्टनंट कर्नल विनीत नारायण यांनी बोलताना वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट ने ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय वाढीसाठी ग्रामीण अर्थकारण,महिला सक्षमीकरण या सरकारच्या योजनांना प्रभावी चालना देऊन सहकार,आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याचा गौरव केला. नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक जी.एस.रावत यांनी सहकार,सहकारी बँका मार्फत सुमारे दीडशे योजना राबविल्या जातात त्या साठी संस्थांनी प्रामाणिक काम केल्यास शेवटच्या घटका पर्यंत सहकाराचा फायदा पोहोचेल यासाठी संस्था चालकांनी जागरूकतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगितले . यावेळी विठ्ठलराव वाडगे पा. सौ.रुक्मिणी ताई वाडगे,स्नुषा सौ.सायली वाडगे,अजय गावडे,शरद गावडे,वृद्धेश्वर मल्टिस्टेट सचिव अँड.शंकर राव गडगे,अँड.विशाल पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र म्हस्के,लेखाधिकारी रघुनाथ डफळ, प्रदीप आठरे,किसन आघाव,सुधाकर वांढेकर,ईश्वर जंजिरे, आदी उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारल्या नंतर प्रतिक्रिया देताना गरीब,गरजू,छोटे व्यावसायिक, महिला वर्ग यांच्या आर्थिक उन्नती साठी आर्थिक क्षेत्रात निस्वार्थी वृत्तीने काम करण्याचा प्रयत्न केला ठेवीदार, स्नेही यांच्या पाठिंब्यावर या प्रयत्नांना यश मिळाले सरकारने याची दखल घेतली भविष्यात शेतकरी, शेतमजूर यांच्या उत्कर्षासाठी निश्चित प्रयत्न करू असे विठ्ठलराव वाडगे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी