मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा नगर पंचायत कार्यालयात सोडणार-कैलास दरेकर

By : Polticalface Team ,Fri Mar 18 2022 14:41:35 GMT+0530 (India Standard Time)

मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा नगर पंचायत कार्यालयात सोडणार-कैलास दरेकर आष्टी(प्रतिनिधी)-गेल्या अनेक दिवसांपासून आष्टी शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून, या जनावरांमुळे लोकांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.जर नगर पंचायत ने आठ दिवसात या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर शहरातील सर्व जनावरे आष्टी नगर पंचायत कार्यालयात आणून सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.               गेल्या तीन चार महिन्यापासून आष्टी शहरात पन्नास ते साठ मोकाट जनावरे फिरत असून,त्यामध्ये तीन ते चार कटाळे बैल पण असून,या जनावरांची व्यापारपेठेच झुंज होते.त्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव पण जाऊ शकतो.याबाबत नगर पंचायतला वेळोवेळी लेखी तोंडी माहिती दिली.तसेच एकवेळेस रस्तारोकोही केला होता.तरीही या निगरगठ्ठ गेड्यांची कातडे असलेल्या नगर पंचायत प्रशासनाला कसलाच फरक पडत नाही.या जनावरांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका असून,नागरिकांच्या जीवितास काही झाल्यास यास सर्वस्वी नगरपंचायत प्रशासन जबाबदार असेल,ह्या मोकाट गुरे तसेच इतरही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा,अन्यथा हे सर्व मोकाट जनावरे नगरपंचायत कार्यालयात सोडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर  यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी,तहसिलदार आष्टी व पोलिस निरीक्षक आष्टी यांना दिलेल्या निवेदनातुन दिला आहे. पंचवीस तारखेला गुरं नगर पंचायतमध्ये सोडणार-दरेकर गेल्या तीन चार महिन्यापासून आष्टी शहरात मोकाट जनावरे,डुकरे यामुळे व्यापारपेठेत नागरीक येण्यास टाळतात तसेच जवळपास पन्नास ते साठ जनावरांनी नागरीक परेशान झाले आहेत.जर या जनावरांच्या झुंजीमुळे एखाद्या नारीकांचा जीव गेला तर याला जबाबदार नगर पंचायत राहिल.जर आठ दिवसात या जनावरांचा बंदोबस्त नाही केला तर दि.25 मार्च रोजी नगर पंचायत कार्यालयात हे सर्व मोकाट जनावरे सोडण्यात येतील. -कैलास दरेकर,जिल्हाध्यक्ष मनसे नगर पंचायतचे अधिकारी गितेंना काम न करण्याची अॅलर्जी आष्टी नगर पंचायतचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी अजिनाथ गिते हे आष्टी नगर पंचायतला असून अडचण नसून खोळंबा असे म्हणटले तरी वावगे ठरणार नाहीत.साधं निवेदन जरी नगर पंचायतला घेऊन गेले तरी हे महाशय शियापाला या निवेदनाच्या पोहच वर सही करायला लावतात.ह्या नगर पंचायतच्या गिते अधिकारी यांना काम न करण्याची अॅलर्जी असल्याचे निदर्शनास आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी