किन्नर सपना आणि बाळूचा जगावेगळा विवाह शिवलक्ष्मीच्या साक्षीने थाटात संपन्न करनी सेना आणि समाज कल्याण विभागाने केले कन्यादान

By : Polticalface Team ,Mon Mar 21 2022 01:01:18 GMT+0530 (India Standard Time)

किन्नर सपना आणि बाळूचा जगावेगळा विवाह शिवलक्ष्मीच्या साक्षीने थाटात संपन्न 
करनी सेना आणि समाज कल्याण विभागाने केले कन्यादान बीड प्रतिनिधी : किन्नर सपना आणि बाळूचा जगावेगळा विवाह भारतातील पहिली सून होण्याचा ज्यांनी मान मिळवला त्या शिवलक्ष्मी यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिरामध्ये धार्मिक विधीनुसार उत्साही वातावरणात आणि थाटामध्ये पार पडला. बीड येथील ऐतिहासिक श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर परिसरात सोमवार दिनांक 7 मार्च 2022 रोजी सकाळी 11.35 वाजता जगावेगळा किन्नर सपना आणि बाळूचा विवाह अखेर थाटामाटात संपन्न झाला.सकाळी 11:30 वाजता श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिर परिसरात नववधू किन्नर सपना आणि नवरदेव बाळू यांचे आगमन होताच विधीवत पूजन करून कंकालेश्वर मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊन सजलेल्या रथा मधून नवरदेवाची भव्यदिव्य वरात काढण्यात आली. या वरातीमध्ये साक्षात शिवलक्ष्मी, त्यांचे पती संजय झाल्टे, किन्नर आखाड्याचे मुख्य व्यवस्थापक श्री महंत ऋषिकेश नंदगिरी, तसेच शिवलक्ष्मीचे दीर तेजस झाल्टे रथामध्ये सहभागी झाले होते. नवरदेवाची वरात कंकालेश्वर मंदिर ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत वाजत गाजत काढण्यात आली. यावेळी किन्नर महिलांनी मनसोक्त नृत्य करून या जगावेगळ्या बीड जिल्ह्यात होत असलेल्या पहिल्या विवाह सोहळ्याचा आनंद घेतला. यानंतर धार्मिक विधीनुसार 5 पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अंतरपाट धरून मामांच्या साक्षीने मंगलाष्टक म्हणून हा जगा वेगळा विवाह अखेर पूर्ण झाला. या विवाह सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे भारतामध्ये तृतीयपंथीयांचा हा दुसरा विवाह असला तरीदेखील सार्वजनिक रित्या सर्वसामान्य वधू-वरांचे विवाह ज्या पद्धतीने वाजत-गाजत साजरे होतात. त्याला लोक मान्यता मिळते. अगदी त्याच धर्तीवर हा विवाहसोहळा पार पडल्याने असा विवाह कदाचित भारतामध्ये तो सुद्धा बीडमध्ये पहिल्यांदाच पार पडला. या वेळी कन्यादान करण्यासाठी करणी सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांच्यासह त्यांच्या सहकारी प्रीत कुकडेजा, शीतल राजपूत, शितल धोंडरे व पत्रकार शेख आयेशा आणि प्रशासनाच्या वतीने समाज कल्याण विभाग आयुक्त सचिन मडावी आणि त्यांच्या प्रशासकीय टीमने अधिकृत पणे कन्यादान केले. यावेळी किन्नर सपना आणि बाळू यांच्या जगावेगळ्या विवाहाला जनमान्यता देण्यासाठी दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, पत्रकार शेख आयेशा, संपादक प्रतिभा गणोरकर यांनी घेतलेले खडतर परिश्रम अखेर यशस्वी ठरले. या विवाह सोहळ्यात कुठलीही बाधा न येता अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात विवाह पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून 50 पेक्षा अधिक किन्नर महिला आपल्या गुरुं सोबत शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. या विवाह सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सह संपादक तथा पत्रकार नितेशजी उपाध्ये पत्रकार संजय कुलकर्णी कुकडगावकर सह विविध सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, सेवाभावी संस्थेचे प्रमुख पदाधिकारी, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, सोशल मिडियातील पत्रकार, संपादक, प्रेस फोटोग्राफर, प्रेस कॅमेरामन, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विवाह सोहळ्याची सांगता मिष्ठान्नाने झाली. हा जगा वेगळा विवाह सोहळा बघण्यासाठी बघ्यांनी तोबा गर्दी केली होती.पोलीस बंदोबस्तात हा विवाह सोहळा शांततेत पार पडला. किन्नर महिलांना साडी चोळी भेट जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जगदविवेक प्रतिष्ठान आणि भाजपाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यासह या विवाह सोहळ्याला उपस्थित झालेल्या राज्यभरातील 40 पेक्षा अधिक किन्नर महिलांना साडी चोळी भेट देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. करणी सेनेने केले कन्यादान करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांच्यासह प्रिती कुकडेजा, शितल राजपूत, शितल धोंडरे,पत्रकार शेख आयेशा यांनी सर्वप्रथम किन्नर सपना यांच्या लग्नाचे दायित्व पार पाडून कन्यादान देखील संसार उपयोगी साहित्य भेट देऊन केले. समाज कल्याण विभागाने सुद्धा केले कन्यादान प्रशासनाच्या वतीने समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन मडावी यांनी या जगावेगळ्या विवाह सोहळ्यात किन्नर सपना यांचे कन्यादान केले याप्रसंगी सुभाष साळवे जिल्हा कृषी अधिकारी बीड, शिवप्रसाद जटाळे जिल्हा मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड, विजय देशमुख जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि प बीड, तसेच तत्वशिल कांबळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान बीड, अशोक तांगडे जागर प्रतिष्ठान बीड, समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी वृंद या कन्यादानसह विवाह सोहळ्याला उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे समाज कल्याण विभागाच्या वतीने सर्व वऱ्हाडी मंडळींना फेटे परिधान करण्यात आले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.