श्री आनंद महाविद्यालयात ई- कंटेंट डेव्हलपमेंट कार्यशाळा
By : Polticalface Team ,Mon Mar 28 2022 11:46:45 GMT+0530 (India Standard Time)
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील श्री आनंद महाविद्यालय येथे नॉलेज ब्रिज व डिजिटल टिचींग सोलुशन यांच्या संयुक्त विद्यमाने ई कंटेंट डेव्हलमेंट या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्य शाळेचे उद्घाटन श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव सतिश गुगळे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रा. एकनाथ कोरे व प्रा.भुषण कुलकर्णी यांनी उपस्थित शिक्षकांना शैक्षणिक व्हिडिओ मेकिंग चे प्रशिक्षण दिले.
या कार्यशाळेमध्ये संस्थेचे सचिव सतिश गुगळे यांनी मार्गदर्शन करतांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई कंटेंट तयार करावे व त्याचा उपयोग विद्यार्थांना व्हावा, अशी आशा व्यक्त केली. या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थांना तो मुद्दा पुन्हा शिकता येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे खजिनदार सुरेश कुचेरीया, विश्वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्र मुथ्था, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार व सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :