गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी करून गांधीगिरि आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

By : Polticalface Team ,Mon Mar 28 2022 20:37:14 GMT+0530 (India Standard Time)

गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर खिचडी करून गांधीगिरि आंदोलन :-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर बीड प्रतिनीधी: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल सह मोठ्याप्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर किंमत वाढवुन महागाई वाढवण्याच्या धोरणाच्या तसेच शेड्यूल ड्रग्स श्रेणीतील ८०० औषधांच्या १० टक्क्यांनी किंमती वाढविण्यास दिलेली मंजुरीच्या निषेधार्थ व वाढीव किंमती तात्काळ कमी करण्यात याव्यात यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.२८ मार्च २०२२ सोमवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव घेऊन चुलीवर खिचडी बनवुन प्रतिकात्मक गांधीगिरी आंदोलन करत केंद्र सरकारच्या दर वाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात अड.करूणा टाकसाळ, रामनाथ खोड, शेख युनुस च-हाटकर, हमीदखान पठाण,अशोक कातखडे, नितिन सोनावणे, डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, सय्यद आबेद, अंकुश दहे, आदि सहभागी आहेत.
सविस्तर माहीतीस्तव
केंद्र सरकारने दि.२३ मार्च २०२२ रोजी पासुन पेट्रोल-डिझेल सह एलपीजी गॅस प्रति सिलेंडर ५० रू किंमती वाढवल्यामुळे महागाईत भर पडली असून सर्व सामान्यांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर याचा परीणाम होत असून सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले असून केंद्र शासनाच्या दरवाढीच्या धोरणाच्या निषेधार्थ व वाढीव किंमती कमी करण्यात याव्यात अशी मागणी डाॅ.गणेश ढवळे, शेख युनुस,मोहम्मद मोईज्जोदीन, शेख मुबीन, डाॅ.संजय तांदळे, नितिन सोनावणे,आदिंनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांना केली आहे.
औषधांचे वाढीव दर तात्काळ कमी करावेत:-डाॅ.गणेश ढवळे
दि.१ एप्रिल २०२२ पासुन सामान्य आजारापासुन ते गंभीर स्थितीतील रूग्णांवरील उपचारांसाठी वापरण्यात येणारी ८०० औषधे महागणार असून त्यात तापेच्या पैरासिटामोल पासुन कोरोना,हद्यरोग, उच्च रक्तदाब, त्वचारोग, त्वचारोग, अनिमिया, कर्करोग, वेदनाशामक आदि वरील उपचारांसाठी "शेड्यूल ड्रग्स " श्रेणीतील औषधांच्या किंमती १० टक्क्यांनी वाढविण्यास केंद्र सरकारने दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्यात यावी दैनंदिन वापरातील जीवनावश्यक औषधांच्या किंमती वाढल्यामुळे जगणंच महाग होणार आहे त्यामुळेच वरील वाढीव दर घटविण्यात यावेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.