By : Polticalface Team ,Sun Apr 03 2022 14:58:21 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा:
कर्ज प्रकरणी दिलेला २९ लाख रुपयांचा धनादेश न वठल्याने श्रीगोंदा येथील मा. न्यायालयाने कर्जदारास २ वर्षे सक्तमजुरी शिक्षा व ५९ लाख रुपये दंड भरपाई देण्याचा निकाल दिला
याबाबत मिळालेली माहितीनुसार, प्रकाश दादासाहेब निंभोरे असे या कर्जदाराचे नाव असून, निंभोरे यांनी ९ नोव्हेंबर २०१३ रोजी येथील वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट को-ऑप सोसायटी मधून १ वर्ष मुदतीसाठी २५ लाख रुपये कर्ज घेतले होते. वेळेवर हफ्ते न भरल्याने वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटने त्यांना नियोजित हफ्ते भरण्यास सांगितले. यावर निंभोरे यांनी २६ मे २०१४ रोजी २९ लाख रुपयांचा बँक ऑफ इंडिया श्रीगोंदा शाखेचा धनादेश दिलता
यानंतर सदरील धनादेश न वठल्याने.. वृद्धेश्वर मल्टिस्टेट ने कलम १३८ नुसार श्रीगोंदा कोर्टात दावा दाखल केला होता. या प्रकरणी मा.न्यायालयाने २८ मार्च २०२२ रोजी कर्जदारास २ वर्षे सक्तमजुरी शिक्षा तसेच ५९ लाख ३७ हजार ४४० रुपये १ महिन्यात भरण्याचा निकाल न्यायाधीश एन.एस.काकडे यांनी दिलाय. दंड न भरल्यास ६ महिने शिक्षा सुनावली आहे.
सदर प्रकरणी वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट वतीने अँड.प्रतापराव देशमुख यांनी काम पाहिले त्यांना वृद्धेश्वर अर्बनचे रमेश गावडे यांनी सहकार्य केले
वाचक क्रमांक :