शेडगाव येथील रस्ता रोको आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित.
By : Polticalface Team ,Tue Apr 05 2022 15:59:18 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: आढगाव फाटा ते हिरडगाव चौक, टाकळी कडेवळीत ते शेडगाव रस्ता हा डांबरीकरण करण्याच्या कामाच्या प्रस्ताव अर्थसंकल्पामध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे सादर केला आहे. अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्यानंतर काम तात्काळ हाती घेण्याचे नियोजन आहे. या लेखी आश्वासनानंतर शेडगाव ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात येणारे रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.
वाचक क्रमांक :