जिल्ह्यातील उद्योजकांना नेत्यांच्या ब्लॅकमेलींगचा त्रास?उद्योजकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!
By : Polticalface Team ,10-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे):
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योगमित्र समितीची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी उद्योजकांनी आपल्या अडचणी सांगितल्या. ज्यात ठरावीक राजकीय पक्ष आणि स्वयंघोषित नेत्यांकडून खोट्या तक्रारी दाखल करून ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचा मुद्दा उद्योजकांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर मांडला. तसेच या सर्व गोष्टींवर प्रामुख्याने लक्ष देऊन याबाबत तोडगा काढण्याची मागणी देखील उद्योजकांनी केली आहे.
उद्योजकांच्या तक्रारी
- उद्योजकांनी बेकायदा अतिक्रमण केल्याच्या खोट्या तक्रारी केल्या जातात.
- कारवाई करण्यासाठी, उद्योग बंद करण्यासाठी निवेदन दिले जात आहे.
- कारखान्यासमोर अथवा एमआयडीसीच्या कार्यालयासमोर उपोषणाची धमकी दिली जाते.
- फायर सुरक्षा यंत्रणा आहे काय याबाबत अधिकार नसताना विचारणा केली जाते
- अनेकदा तक्रारी मागे घेण्यासाठी खंडणी मागितले जाते.
वाचक क्रमांक :