उष्णतेमुळे प्राणी,पशुपक्षी हैराण?नागरिकांनी घराजवळ गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची आवश्यकता!
By : Polticalface Team ,11-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे):दुपारी कडक उन्हामुळे सर्व नागरिक हैराण होत असून दिवसभराच्या तापमानामुळे सायंकाळीही दमट उष्ण वातावरण जाणवत आहे. पंख्याची हवा सुद्धा गरमच लागत असून कुलरचा व ए.सी. चा वापर सर्वात आहे.पूर्वी पंख्याच्या हवेवर थंडावा मिळायचा पण आता तापमान वाढत असल्याने छोट्या-मोठ्या कुलरचा वापर घरोघरी होताना दिसत आहे. प्रवास करतानाही अतिशय तीव्र उन्हाचा सामना करावा लागत असून जीवाला थंडावा देण्यासाठी आता रस्त्यावर उसाचा रस, शीतपेय यांच्यासह थंडावा देणारी छोटी मोठी विविध पेयाची दुकाने आहेत.
माणसाप्रमाणे पशुपक्षी तीव्र उन्हामुळे घायाळ होत असून उन्हात सावलीचा सहारा घेताना दिसत आहेत. यावर्षी उन्हाची तीव्रता जास्त आहे. सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाच्या झळया लागत आहेत. सायंकाळी सात पर्यंत ऊन जाणवत आहे. शिवारातील पाणी आटत आहे. हा त्रास पशु, पक्षी, जंगली व पाळीव जनावरांना सहन करावा लागत आहे. उन्हाचा सर्वाधिक फटका दुभत्या जनावरांना बसत असून दुधाचे प्रमाण कमी होत आहे. संकरित गाईंना उन्हाचा त्रास होत आहे. उन्हामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्यासाठी खर्च करावा लागत आहे. दुधाळ जनावरांची वासरे, कालवडी, रेडकू हे उन्हामुळे कासावीस होत आहेत. सध्या शेतीची मशागत सुरू असून उन्हामुळे हे काम सकाळी किंवा सायंकाळी करण्यास शेतकरी प्राधान्य देत आहेत.
जनावरांची काळजी आवश्यक आहे,
उन्हामुळे जनावरे दुध कमी देतात. त्यांच्यामध्ये धापाची क्षमता वाढते. उष्माघातामुळे जनावरे दगावू शकतात.
वाचक क्रमांक :