By : Polticalface Team ,13-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल नॅशनल कमिटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, लक्ष्मी निर्मल प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती संभाजीनगर येथील भानुदासराव चव्हाण सभागृहात छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवारी दि. १४ रोजी जिल्ह्यातील सामाजिक, आरोग्य, विधी, मीडिया क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या गौरव सोहळ्यामध्ये गंगापूर तालुक्याचे भूमीपूत्र राजेंद्र सरोवर यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवण्यात येणार आहे. पत्रकारितेसोबतच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये राजेंद्र सरोवर यांचा मागील २० वर्षांपासून सक्रीय सहभाग याची संस्थेने दखल घेतलेली आहे त्यामध्ये जायंटस क्लबचे सलग ३ वर्षे अध्यक्ष, ग्राहक चवळवळीत सलग ४ वर्षे प्रमुख म्हणून, २०१६ पासून मराठा आरक्षण आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख अभ्यासू मार्गदर्शक म्हणून, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक समिती वेरूळ येथे स्वागताध्यक्ष, गंगापूर तालुक्यातील शेतकरी व बहुजन चळवळीतील मार्गदर्शक म्हणून दादांनी केलेल्या कार्याची दखल घेउन तालुक्यातील योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल संस्थेचे आभार व राजेंद्र सरोवर दादा* यांचे अभिनंदन..! समाजाशी नाळ जोडलेले एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व राजेंद्र सरोवर दादा यांचे विषयी थोडसं
माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…!
काही चांगले, काही वाईट,काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनात घर करणारे.मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक राजेंद्र सरोवर दादा
उच्चशिक्षण घेउनही गंगापूर सारख्या ग्रामीण भागात आदर्श पत्रकारितेची नितीमूल्ये जपत सतत ३३ वर्षे नि:स्पृह पत्रकारितेसोबतच विविध उद्योग-व्यवसायांमध्ये नावलौकिक मिळवून शेतकऱ्यांच्या हितासाठी व सामाजिक कामात सदैव अग्रेसर, प्रसिध्दीच्या क्षेत्रात असूनही प्रसिध्दीपासून कायम दूर राहणारे, जमींर हमसे बेचा ना गया
वरना शाम तक अमीर हो जाते..!
वाकिफ़ तो हम भी हैं
मशहूर होने के तौर तरीकों से....
पर ज़िद तो हमें
अपने अंदाज से जीने की है।
अशीच सदैव वाटचाल ठेवून आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणारे,
सामाजिक, राजकीय, व्यावसायिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेकांना योग्य मार्गदर्शन करून यशाचा राजमार्ग दाखवणारे व खऱ्या अर्थाने गंगापूर तालुक्यातील सर्वांचे पडद्यामागील संकटमोचक/ किंगमेकर म्हणून ओळख असणारे, प्रत्येकाला आपलेसे वाटणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व…..
" बस नाम काफी है.... *राजेंद्र सरोवर दादा*
बाकी आप सब जानते है...!
सर्वत्र देशे गुणवान् शोभते प्रथितो नर:।मणि :शिर्ष गले बाहो यत्र कुत्रापि शोभते।।
कुठल्याही भागात कुठल्याही विषयात जाणकार असलेला गुणी माणुस देशात कुठेही प्रसिद्ध होतोच. रत्न डोक्यावर मुकुटात गळ्यात हारात, दंडावर वाक्यांमधे कुठेही घातले तरी त्याचे तेज उठून दिसते.(पसरते)
ते गंगापूर तालुक्याचे भूमीपुत्र असल्यामुळे आपण सर्व गंगापूर वासीयांसाठीच नव्हे! तर त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकांसाठीच ते प्रेरणेचे सागर,स्रोत आहेत.
म्हणूनच यानिमित्त त्यांना आमच्या मराठी वृत्तपत्राचा सलाम...!
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.
दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.
ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.
दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले
कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.
देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार
श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय
नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!
स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती
श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न