दोन महिन्यांत शहरात 7 जागी मनपा सुरू करणार पे अँड पार्क!

By : Polticalface Team ,14-05-2023

दोन महिन्यांत शहरात 7 जागी मनपा सुरू करणार पे अँड पार्क! मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कॅनॉट प्लेसमधील व्यापाऱ्यांनी मनपाच्या पार्किंग पॉलिसीला विरोध दर्शविला होता.आता मनपा प्रशासकांबरोबर झालेल्या बैठकीनंतर पार्किंग पॉलिसी राबवण्यास त्यांनी संमती दिली आहे. कॅनॉटमध्ये पहिला एक तास पार्किंग मोफत असेल. त्यानंतर दुचाकीसाठी १०, तर चारचाकीसाठी ३० रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय व्यापाऱ्यांच्या वाहनांचीही नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत ३०० वाहनांची नोंद केली आहे. व्यापाऱ्यांनी ‘पे अँड पार्क’मध्ये गाडी उभी करण्यासाठी शुल्क द्यावे लागेल. कॅनॉटमध्ये ५२ ठिकाणी पार्किंगची सोय असून, त्यातील १७ ठिकाणी मोफत पार्किंग असेल.

सध्या कॅनॉटबरोबर अदालत रोड आणि निराला बाजार येथेदेखील ‘पे अँड पार्क’ व्यवस्था सुरू केली आहे. महिनाभरात उस्मानपुरा, सूतगिरणी, पुढच्या टप्प्यात पुंडलिकनगर आणि टीव्ही सेंटर येथे ही सोय सुरू करण्यात येणार आहे.

◆सर्व ठिकाणी नियम सारखेच नसतील◆
कॅनॉट प्लेस बाजारपेठ आहे म्हणून त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची वाहने आणि पहिला तास मोफत असा निर्णय घेण्यात आला आहे. निराला बाजार, टीव्ही सेंटर या बाजारपेठांसाठी हे नियम लागू होऊ शकतात. मात्र, इतर ठिकाणी महापालिका प्रशासकाच्या आदेशानुसार नियम लागू करण्यात येतील. - स्नेहलचंद्र सलगरकर, संचालक, कर्बलेट

◆पहिला तास मोफत, नंतर द्यावे लागेल शुल्क◆
फक्त कॅनॉटसाठी सध्या पहिला तास मोफत, असा नियम करण्यात आला आहे. त्यानंतर दुचाकीला प्रतितास १० रुपये आणि चारचाकीसाठी प्रतितास ३० रुपये दर असेल. मात्र अगोदरच पूर्ण दिवसाची किंवा अधिक तासांची बुकिंग केल्यास सवलत देण्यात येईल, असे मनपाने नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने सांगितले.

◆भविष्यात ५ हजारांवर वाहनतळ उभारणार◆
पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्त्वावर सिडको कॅनॉट प्लेस, निराला बाजार, उस्मानपुरा, अदालत रोड, सूतगिरणी चौक, पुंडलिकनगर, टीव्ही सेंटर या सात ठिकाणी दोन महिन्यांत पार्किंग सुरू होणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरभर ही सेवा सुरू केली जाणार आहे. भविष्यात पाच हजारांपेक्षा अधिक वाहनतळ सुरू करण्यात येईल, असे कंत्राटदाराने सांगितले. यात सर्वात छोटी पार्किंग व्यवस्था पाच दुचाकींसाठी असेल.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष