तिसगावचे ग्रामविकास अधिकारी व सरपंचावर कारवाईची मागणी?
By : Polticalface Team ,14-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
माजी ग्रामपंचायत सदस्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव येथील ग्रामविकास अधिकारी व सरपंच हे दोघे आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर कामे करत अवैध मार्गाने पैसा कमवित आहेत. त्यामुळे यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तशेच त्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अस्लम शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिसगावचे ग्रामविकास अधिकारी ए.आर. गायकवाड हे आपल्या पदाचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या नियमांना ढाब्यावर बसवत अवैध मार्गाने पैसा उकळत आहेत. ग्रामविकास अधिकारी व सरपंच संगनमत करून हा गोरख धंदा करत आहेत. सर्वसाधारण सभेची ग्रामस्तांना कोणत्याही प्रकारची कल्पनासुध्दा दिली जात नाही. ग्रामसभेत जमाखर्च दाखवत नाहीत. जनतेला विविध जनकल्याणकारी योजनांची माहीती देत नाहीत. सरपंचांचा मनमानी कारभार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांकरवी शासकिय व्यायाम शाळेमध्ये सुध्दा हस्तक्षेप वाढला आहे. ग्रामविकास अधिकारी व सरपंच हे संगनमत करून बेकायदेशीर व शासकीय मालमत्तेच्या अनाधिकृत नोंदी घेवून त्यामध्ये गैरमार्गे पैसा कमवित आहेत. यामुळे जनतेचा व गावाचा सर्वांगीन विकास खुंटला आहे. गावात समाजा-समाजात तेढ निर्मान होवून तनाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. समस्त गावकरी यांच्या हेकेखोरपणामुळे हैराण झाले असून विविध योजनांपासून वंचीत राहीले आहेत. या प्रकरणी वरिष्ठांना अनेकवेळा कल्पना देऊनही ते याकडे दुर्लक्ष करतात. वरिष्ठ अधिका-यांच्या अभयामूळे गायकवाड यांची अरेरावी वाढली असुन त्यांच्या आशिर्वादाने त्यांची गेल्या पाच वर्षांपासून बदली सुद्धा झालेली नाही. तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी अव्वाच्या सव्वा बेहिशोबी मालमत्ता जमवली त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करूण त्यांच्या संपत्तीची सीबीआय मार्फत चौकशी करावी व त्यांना पाठीशी घालना-या अधिका-यांची सुध्दा चौकशी होवुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत!अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
वाचक क्रमांक :