छत्रपती संभाजीनगर विभागीय सब ज्युनियर गट मुले/मुली हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा बुधवारी
By : Polticalface Team ,14-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
महाराष्ट्र हॉलीबॉल संघटनेच्या वतीने सब ज्युनियर मुले मुली या गटाच्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल निवड चाचणी स्पर्धा दि. 20 ते 21 मे 2023 रोजी देवळी जिल्हा वर्धा येथे संपन्न होत आहेत.
तरी या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजीनगर विभागातील मुले व मुली निवड चाचणी स्पर्धा दि. 17 मे 2023वार बुधवार रोजी सकाळी 10.00 वा इंद्राऊंड स्पोर्ट्स अकॅडमी मुक्तानंद महाविद्यालय मैदान गंगापूर जि. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना सोबत आधार कार्ड ,बोनाफाइड सर्टिफिकेट ,किंवा नोकरीचे ओळखपत्र असणे आवश्यक आहे . कृपया याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. या निवड चाचणी स्पर्धे करता खेळाडूंची जन्मतारीख 01/01/ 2007 नंतरची असावी,
या स्पर्धेकरिता छत्रपती संभाजी नगर जालना हिंगोली परभणी या जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन छत्रपती संभाजी नगर व्हॉलिबॉल संघटनेचे विभागीय सचिव तथा छत्रपती संभाजी नगर जिल्हा अध्यक्ष डॉ.आबासाहेब शिरसाट, हिंगोली जिल्ह्याचे एम ए बारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आबासाहेब शिरसाट व मेहमूद पठाण यांच्याशी संपर्क साधावा.
वाचक क्रमांक :