मराठा आरक्षण मुख्य याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
पोलीस दलातील चालक व शिपाई या पदांकरिता 2019 मध्ये सरकारने भरती जाहीर केली होती. त्यात काहींची निवड झाली व काहींची तांत्रिक कारणामुळे निवड रखडली.त्यामुळे निवड झालेले व निवड न झालेले यांच्यामध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन दिले व नवीन 50 पदे निर्माण करून हा वाद सोडवावा आणि सर्वांनाच दिलासा द्यावा अशी मागणी आर आर पाटील फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा मराठा आरक्षण मुख्य याचिकाकर्ते व अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर चे विनोद पाटील यांनी केली. हा वाद सुरू असल्यामुळे चांगले गुण मिळवूनही अनेक जण पोलीस सेवेत येऊ शकलेले नाहीत. नवीन भरतीतही त्यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे 2019 मधील सर्व पात्र उमेदवारांना सामावून घेण्यासाठी नवीन पदे निर्माण करण्यात यावी अशी विनंती विनोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. उपमुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न समजावून घेतला व प्रशासकीय पातळीवर त्याची सोडवणूक करण्याबाबत सकारात्मकता दाखवली.
वाचक क्रमांक :