छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गोशाळेत चारा वाटप
By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त गंगापूर येथील गोशाळेत छत्रपती संभाजी महाराज प्रतिमा पूजन करून शिवशंभू योद्धा ग्रुपच्या माध्यमातून चारा वाटप करण्यात आला.छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न हा ग्रुप करत असतो.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पुंडेकर,तुशांत पठाडे, उमेश चव्हाण, विशाल कराळे,अनिल नरोडे आकाश मोरे,योगेश कुरकुटे आदींसह ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.
वाचक क्रमांक :