१६ वर्षांची नवरी, २६ वर्षांचा नवरा! लग्नापुर्वीच धडकले दामिनी पथक
By : Polticalface Team ,15-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
वडिल सुरक्षारक्षक असून, दारूचे प्रचंड व्यसन आहे. दोन मुलींच्या सांभाळण्याचा भार आईवरच होता. त्यामुळे आईनेच १६ वर्षांच्या मुलीचे लग्न २६ वर्षाच्या मुलासोबत जमवले. या अल्पवयीन मुलीच्या विवाहाची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून दामिनी पथकाने घटनास्थळ गाठत नवरा-नवरीच्या आई-वडिलांना समजावून सांगत बालविवाह रोखला. ही घटना उस्मानपुऱ्यातील मिनाताई ठाकरे सभागृहात रविवारी दुपारी घडल्याची माहिती भरोसा सेलच्या निरीक्षक आम्रपाली तायडे यांनी दिली.
भरोसा सेलच्या निरीक्षक तायडे यांना उस्मानपुऱ्यात बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फासाटे, भरोसाच्या उपनिरीक्षक ज्योती गात यांना सहकाऱ्यांसह खात्री करण्यासाठी पाठविले. दामिनी पथकाने साध्या वेशात घटनास्थळ गाठत लग्न होणार कन्फर्म केले. सभागृहात नवरदेव होता. अडीच वाजेच्या सुमारास नवरी आली. तेव्हा पथकाने नवरीच्या वयाचा पुरावा नातेवाईकांकडे मागितला. तेव्हा नवरीची जन्मतारीख ३० मार्च २००७ निघाली. नवरीला नुकतेच १६ वर्ष पूर्ण झाले होते. नवरा मुलाचे वय २६ वर्षांपेक्षा अधिक होते.
दामिनी पथकाने नातेवाईकांना लग्नाचे दुष्परिणाम सांगितले. मुलीचा विवाह केल्यास बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार सर्वांवर गुन्हे दाखल होतील, असे स्पष्ट केले. तेव्हा नातेवाईकांनी चुक झाल्याचे मान्य करीत १८ वर्ष होईपर्यंत मुलीचे लग्न करणार नसल्याचे लेखी लिहुन दिले. घटनेची उस्मानुपरा ठाण्यात नोंद केली. ही कारवाई निरीक्षक अम्रपाली तायडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिता फासाटे, ज्योती गात, सहायक फौजदार लता जाधव, हवालदार निर्मला निंभोरे, हिरा चिंचोळकर, आकाश नरवडे, चाईल्ड हेल्पलाईनच्या अन्नपूर्णा ढोरे यांनी केली.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.