गंगापूर तालुक्यातील शिक्षक बनला चोर,भविष्यात विद्यार्थ्यांकडून गुन्हे घडल्यास शिक्षकच जबाबदार?
By : Polticalface Team ,17-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
आपल्या पृथ्वीतलावरती गुरू शिष्य परंपरा आहे. आपण महाभारतामध्ये,इतिहासामध्ये गुरूचे महत्व जाणून आहोत!
आजच्या वर्तमानात गुरू जर असे वागले तर इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांचे भविष्य नक्कीच चोऱ्या,लबाड्या, उकांड्या वरची कागद वेचणी,हमाली करणे,मोठ मोठे चोरीचे गुन्हे करणे अशाच प्रकारची शिकवण आजचे शाळेतील शिक्षक वर्ग देत तर नाहीना? हा सवाल असा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. सरकारी शाळेतील ८० टक्के मुले ही इंग्रजी शाळेत ते पाठवीत आहेत.म्हणजेच त्या शिक्षक वर्गाला सुद्धा माहिती आहे की, आमचेच शिक्षकमित्र विद्यार्थी घडवूच शकत नाही.त्यांना खंबीरपणे उभे राहण्यासाठी सक्षम बनवूच शकणार नाही? असे चित्र संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिसून येत आहे. विशेष म्हणजे गंगापूर तालुक्यातील सर्वात मुख्य असलेली जिल्हा परिषदेची तुळशीबाग प्राथमिक शाळा ही बंद पडण्याच्या मार्गावर आहे, गटशिक्षण अधिकारी आणि शिक्षक वर्ग बघ्याची भूमिका घेवून आपापले महिन्याचे पगार उचलून आनंद साजरा करत आहेत.आणि इकडे गोर गरीब नागरिक इंग्रजी शाळेची सर्वात मोठी फीस भरून कर्जबाजारी होत आहे?
गंगापूर तालुक्यातील कनकोरी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा सामानाची चोरी करून विक्री करणाऱ्या शाळेचा मुख्याध्यापक आणि शिक्षकांविरोधात निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिक्षकी पेशाला अशोभनीय अशी ही घटना गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान घडली होती.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आलेला किराणा साहित्य घरी घेऊन जाणारे शाळेचे मुख्याध्यापक फीरोज नादर तडवी, वसंत दंगल वाडीले यांना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले होते शाळेतील किराणा साहित्य घेवून परागंदा होण्याच्या तयारीत असल्याचा संतापजनक प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होता.
या शाळेतील शिक्षकांचा पोषण आहारासाठी आलेला किराणा घरी घेऊन जाण्याचा प्रकार गावातील माजी शालेय समीती अध्यक्ष प्रताप पवार आणि चाणाक्ष मंडळीच्या यापूर्वीच अनेक वेळा निदर्शनास आले.
वाचक क्रमांक :