मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील रवींद्र निंबाळकर व पुनम देशमुख रा. सिरसगाव यांचा विवाह काल दिनांक 16.05.2023 रोजी पार पडला. चिरंजीव रवींद्र निंबाळकर यांनी जुन्या रूढी परंपरेला चालना देत चक्क नवरीला बैलगाडीतून घरी नेले.असा प्रवास नवरदेव,नववधू यांनी केला.नवरदेव रवींद्र आणि पुनम यांनी कुठलीच बुलेट,ट्रॅक्टर,हेलिकॉप्टरची अपेक्षा न ठेवता बैलगाडीला आपलस केलं आहे,यामुळे लग्नाच्या खर्चामध्ये घटही झाली आणि पारंपरिक संस्कृतीचा ठेवा जतनही करण्यात आल्याचं स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव डॉ.आबासाहेब शिरसाट यांनी सांगितलं.या प्रयोगामुळे गावागावांतून आश्चर्याची घटनाच बघावयास मिळाली. दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
वाचक क्रमांक :