शेतातील कांद्याच्या चाळीत सुरु होता जुगार अड्डा; पोलिसांनी छापा टाकत ठोकल्या बेड्या

By : Polticalface Team ,17-05-2023

शेतातील कांद्याच्या चाळीत सुरु होता जुगार अड्डा; पोलिसांनी छापा टाकत ठोकल्या बेड्या मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत शेतातील कांद्याच्या चाळीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना याबाबत गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर यावेळी एकूण 36 लाख 88 हजार 930 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्याप्रमाणात जुगार अड्डा सुरु असताना स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेला याबाबत माहिती कशी मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर हद्दीतील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (रा. श्रीकृष्णनगर, गंगापुर) याच्या शेतातील 3000 स्क्वे.फुटाच्या पत्र्याच्या शेडमधील कांद्याच्या चाळीमध्ये अवैधरित्या जुगार अड्डा चालू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांना मिळाली होती. यावरुन पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहा.पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाट आणि देविदास वाघमोडे यांच्यासह पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करुन छापा मारण्याचे सूचना देऊन रवाना केले.

दरम्यान या कारवाईसाठी वैजापूर इथून आणखी एक पोलीस पथक सोबत घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करुन श्रीकृष्णनगर, गंगापूर इथल्या ज्ञानेश्वर रंगनाथ यादव याच्या शेताजवळ रात्री आठ वाजेच्या सुमारास सापळा लावला. हा संपूर्ण परिसर अंदाजे जवळपास 11 एकरचा असून, संपूर्ण परिसराला संरक्षण भिंतीसह काटेरी तारेचे फेन्सिंग करण्यात आलेले आहे. या शेतातील प्रवेश करण्यासाठी फक्त एकच गेट असून तो लॉक करुन ठेवण्यात आला होता. तसेच गेट जवळील आत जाण्याचा परिसर 100 मीटरपेक्षा अधिक असल्याने याठिकाणी एक व्यक्ती हा येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर देखरेखीकरता ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांची कोणतीही हालचाल लक्षात येताच आतील लोकांना सावध करण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती.

पोलिसांनी जखमांचा विचार न करता शेतात प्रवेश केला त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पथकातील पोलिसांनी या संपूर्ण परिसराची बारकाईने आणि छुप्या पद्धतीने पाहणी व पडताळणी करुन छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलिसांच्या पथकांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास अंधारात मुख्य प्रवेशद्वाराचे गेट आणि संरक्षण भिंतीवरुन उड्या मारुन शेतात प्रवेश केला. याठिकाणी लावण्यात आलेल्या काटेरी तारेचे फन्सिंगमुळे पोलिसांना आत प्रवेश करताना तारेचे कट शरीरावर लागून जखमा झाल्या. मात्र पोलिसांनी जखमांचा विचार न करता अंधारात शेतात प्रवेश करत गेटपासून काही अंतारवर लोखंडी जाळी असलेल्या पत्र्याच्या शेडपर्यंत पोहोचले. यावेळी कांद्याच्या चाळीजवळ लपतछपत जाऊन पोलिसांच्या पथकाने पडताळणी केली असता तिथे 15 लोक हे तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना दिसले. त्यामुळे पथकाने अचानक घेराव टाकून छापा टाकला असता यातील 4 जण अंधाराचा फायदा घेऊन बाजूच्या शेतातून पळून गेले. तर इतर 11 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

यांना ताब्यात घेण्यात आले... ज्ञानेश्वर रंगनाथ यादव (वय 45 वर्ष रा. श्रीकृष्णनगर,गंगापूर), शिवाजी नारायण खैरे (वय 41 वर्षे रा वळदगाव, पंढरपूर, औरंगाबाद), चंद्रकांत भाऊसाहेब गायकवाड (वय 35 वर्षे रा. गंगापूर), शुभम राधाकृष्ण साळवे (वय 21 वर्षे रा.गंगापूर), मोहसीनअली अब्बास रजवी (वय 33 वर्षे रा. औरंगाबाद), शफिक गुलाम रसूल (वय 21 वर्षे रा.कन्नड), प्रकाश लहूजी खाजेकर (वय 34 वर्षे रा.गंगापुर ), रमेश एकनाथ मोरे (वय 40 वर्षे घोडगाव, गंगापूर), संतोष नामदेव काळे (वय 40 वर्षे रा.गंगापूर), हकिम शेख चाँद (वय 20 वर्षे रा.गंगापूर), दिलीप नामदेव पवार (वय 39 वर्षे रा. गंगापूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्या ताब्यातून 3 लाख 36 हजार 230 रुपये रोख तसेच 04 चारचाकी वाहने, 03 दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट 13, जुगाराचे साहित्य असा एकूण 36 लाख 88 हजार 930 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न