जिद्द असल्याने लग्न झाल्यानंतर मुबंई पोलीस सेवेत भरती!
By : Polticalface Team ,19-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, तालुका विरमगाव येथील रहिवासी असलेल्या मनीषा गोरे मुबंई पोलीस दलात भरती झाल्या आहेत.विशेष बाब ही की, लग्नानंतर मुलींना सासरची सर्वच कामे घरीच करावे लागेल व आता सासू सासरे शिक्षण घेऊन देतील का?असे विचार मनात येतात.सौ.मनीषा चंद्रकात गोरे
या मुबंई पोलिस दलात भरती झाल्या आहेत.विशेष म्हणजे तिचे आई वडील ती शिक्षण घेत असताना शेती करून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले. वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. मुलीने पूर्ण जिद्दीने अभ्यास करून ग्राउंड प्रॅक्टिस करून दिनांक 16 मे रोजी मुंबई या ठिकाणी पोलीस दलात भरती झाल्या. आई वडील हे प्रेमळ स्वभावाचे व सर्व समाज बांधवांना प्रेमाने व आपुलकीने बोलण्याचा स्वभाव त्यांचा आहेत.
शेती काम करत असताना विविध अडचणीचा सामना करावा लागला. शेतीवर त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करून शिक्षण व मुलीचे लग्न केले.
मनीषा यांचे लग्न झाले पण त्या खचल्या नाही! कारण आई वडील, पती, सासू सासरे याचे कष्ट दिसत होते. त्यांचे मोठे भाऊ नागपूर येथे पोलीस उपनिरीक्षक आहेत.
वाचक क्रमांक :