आदर्श शिक्षक कडू देवळे यांनी संघर्षातून गाठले यश!(शब्दसंकलन:योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,21-05-2023

आदर्श शिक्षक कडू देवळे यांनी संघर्षातून गाठले यश!(शब्दसंकलन:योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) 1998-2000 या कालावधीत कडू देवळे यांचे डी .एड. चे शिक्षण अतिशय संघर्षमयरित्या पूर्ण झाले. 2001 मध्ये ते नगर जिल्हयात नेवासा पंचायत समिती अंतर्गत सुरेगांव दहेगांव या ठिकाणी रुजू झाले . त्या ठिकाणी पहिली ते चौथीपर्यंत वर्ग होते .विदयार्थ्यांना आनंद होईल जिद्द निर्माण होईल असे अध्यापन त्यांनी सुरू केले.विद्यार्थ्यांचे गट तयार करून अभ्यासाला एक वेगळीच चालना दिली.

2002 मध्ये ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये नियुक्त झाले . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगी ता . गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांची नियुक्ती झाली . या ठिकाणी चार वर्ष सेवा केली . या कालावधीत शाळेत चांगलीच शिस्त निर्माण केली .विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा व पालकांच्या आज्ञांचे पालन करून आदर करावा असा एक नियमच त्यांनी तयार करून टाकला . त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता तर वाढलीच व सुसंस्काराची भर पडली .चावडी वाचन हा उपक्रम घेण्यात येत होता. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये कोण चांगला वाचतो याची चुरस लागायची व त्यामुळे प्रयत्न जास्त करायचे .

त्यांची बदली2006 मध्ये जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मालुंजा बु या ठिकाणी झाली . मालुंजा या ठिकाणी अभ्यासाची गोडी लागावी म्हणून गट केले , त्याचा परिणाम अतिशय चांगला झाला . दुपारच्या सुट्टीत स्वयंअध्ययनाची सवय चांगलीच रुजली . दुपारच्या सुट्टीत देखील मुलेआठ दहा पानं शुद्धलेखन करायची .विध्यार्थी घरी कसे वागतात यासाठी पालकांशी संपर्काचे प्रमाण जास्त होते . त्यामुळे विद्यार्थ्यांना वाटायचे सर घरच्यांना भेटतात म्हणून विध्यार्थी आणखीनच चांगले वागायचे . याच कालावधीत बाल आनंदनगरी तसेच शिक्षण महोत्सव यासारखे विविध उपक्रम घेण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांची सृजनशीलता वाढली .

2014 साली ते पदवीधर स्वीकारले त्यामुळे त्यांची बदली मालुंजा वरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर या ठिकाणी झाली . शहापूरला चार वर्ष सेवा केली . या कालावधीत शाळेत शिस्तबद्ध व आनंददायी वातावरण तयार झाले . गुणवत्तेला प्राधान्य म्हणून विविध स्पर्धा घेवून जो विध्यार्थी किंवा विध्यार्थीनी अग्रेसर असेल त्यांच्या हाताने ध्वजारोहण करायचो . त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये अभ्यास व गुणवत्तेचे ध्येय जागृत व्हायचे . शाळा डिजीटल व्हावी यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना घेवून नगर जिल्हयातील सुदामवाडी या ठिकाणी घेवून गेले , त्या गोष्टीचा एवढा प्रभाव झाला, की पंधरा दिवसात पाच लाखाचा सहभाग गोळा झाला . प्रत्येक वर्गात 43-49 इंची पर्यंत एलईडी व त्याच्या जोडीला सीपीयू तसेच वायरलेस किबोर्ड व माऊस आणले .पाहिली ते आठवी पर्यंतचा चाणक्य मंडल चा अभ्यासक्रम घेतला . त्यामुळे प्रत्येक विध्यार्थी संगणक साक्षर होवून अभ्यासात खूपच गोडी निर्माण झाली .

त्यानंतर 2018 मध्ये जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा गाढे पिंपळगांव ता . वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी रुजू झाले. सुरवातीला तालूका बदलला म्हणून वाईट वाटले पण श्रीमान नाईक सरांसारखे प्रेरणादायी मार्गदर्शक मिळाल्याने नवचैतन्य फुलले . शाळेत विदयार्थ्यांचे विविध खेळ , स्पर्धा , उपक्रम यासाठी आमची टीम खूपच चांगली आहे . शाळेत शिक्षक दिन , स्वातंत्र्यदिन , प्रजासत्ताक दिन असे विविध कार्यक्रम अतिशय आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरे होतात व लोकांचाही चांगला सहभाग असतो .विद्यार्थी घरी व शाळेत अतिशय छान वागतात . शाळेत शिक्षक व विदयार्थी एकाच पंगतीत जेवायला बसतो .जेवणापूर्वी प्रार्थना घेतो आणि ताटात जेवढे लागते तेवढेच प्रत्येकजण घेतो . ताटात अन्नाचे कण कोणीही शिल्लक ठेवत नाही.विद्यार्थ्यांना या सवयी घरी सुद्धा लागल्या आहे . त्यामुळे पालकांनाही चांगले वाटते . आमची गुणवत्ता बघून ग्रामपंचायतने आम्हाला पेव्हर ब्लॉक्स बसून दिले तसेच डिजीटलसाठी दोन लाखाचे योगदान दिले . प्रत्येक शाळेत असताना स्नेहसम्मेलन , शैक्षणिक सहली , ग्रामस्वच्छता अभियान यासारखे कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे पालकांचे शाळेविषयी चांगले मत झाले .

या त्यांच्या अठरा वर्षाच्या सेवेत प्रत्येक विदयार्थ्यांशी संवाद साधन्याची भाषा दादा व दिदी ने सुरवात होत असल्याने साहजिकच जिव्हाळा वाढतो व विद्यार्थी शैक्षणिक व सुसंस्काराने चांगले घडायला लागतात . याचा अनुभव त्यांना आला . असाच एक प्रसंग शहापूरला झाला; शाळा डीजीटल केली पण उदघाटन बाकी होते . त्याच कालावधीत त्यांची बदली गाढे पिंपळगांव या ठिकाणी झाली .26 जानेवारी2019 ला उदघाटनाचा कार्यक्रम ठेवला होता . त्याचे निमंत्रण होते . गाढे पिंपळगांवचा कार्यक्रम आटोपून कडू देवळे हे शहापूरला उदघाटनासाठी गेले . कार्यक्रम चालू झालेला होता . कार्यक्रमासाठी आमदार , कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती , जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , शिक्षण खात्याचे अधिकारी व अन्य बरेच मान्यवर उपस्थित होते . शाळेच्या गेटमधून त्यांची एन्ट्री होताच सर्व तीनशे विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उठून उभा राहिले व माझ्या नावाचा गजर चालू केला . हे पाहून आमदारासह सर्व मान्यवर चकीत झाले . आमदार श्रीमान सुभाष झांबड यांनी त्यांना स्टेजवर बोलून घेतले व सांगीतले की, असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला . गुरूजीला एवढं प्रेम!

मी ज्या ज्या शाळेत गेलो त्या त्या ठिकाणी माझ्यापेक्षाही चांगले असणारे सहकारी मला मिळत गेले त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पटसंख्येत खूप वाढ झाली आणि शैक्षणिक वातावरण फुलत गेले .

2007 साली इयत्ता तिसरीच्या भूगोलाची मसूदा प्रत तयार करण्यासाठी पाठयपुस्तक मंडळात बालभारती पुणे येथे पत्नी उजा व देवळे यांची निवड झाली होती . 2008 मध्ये जीवन शिक्षण लेखकांची कार्यशाळा पुणे या ठिकाणी निवड झाली. . पुष्पगुच्छ : निसर्गाशी मैत्री हा लेख देखील प्रसिद्ध झाला.

2012 मध्ये पाठ्यपुस्तक मंडळ पुणे येथे सातवीच्या भूगोलाच्या पुस्तकाच्या समीक्षणासाठी निवड झाली.
2018 साली शहापूर ग्रामपंचायतने रामगिरी महाराज यांच्या हस्ते सपत्नीक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले . तसेच आजपर्यंत विविध संघटना व संस्थांनी विविध पुरस्कार देवून कडू देवळे यांना सन्मानित केले आहे .2013 साली भारतीय समाज विकास अकादमीने थायलंड या ठिकाणी तेथील शिक्षणमंत्र्याच्या हस्ते ग्लोबल गुणीजन पुरस्काराने सन्मानित केले .
आपले शैक्षणिक क्षेत्र खूप चांगले आहे . कारण आपले विध्यार्थी _l
फुलतात कळ्या
होतात फुले
सुगंध त्यातून
सर्वत्र दरवळे

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.