पावसाची स्थिती काय, मान्सून कधी येणार? पंजाबराव डख यांनी वर्तवला असा अंदाज!
By : Polticalface Team ,22-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथे एका कार्यक्रमासाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख आले असता त्यांनी आपल्या अभ्यासानुसार यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे सांगितले. तसेच पाऊस कुठं पडतो याची बरीच माहिती उदाहरणांसह सांगितली. तर येत्या 22, 23, 24 मे रोजी मान्सूनपूर्व पाऊस पडणार असून, जून महिन्याच्या 1, 2, 3 तारखेला देखील पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. तर 8 जून रोजी महाराष्ट्रात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून यंदा चांगल्या प्रकारे पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना डख म्हणाले की, मी फक्त शेतकऱ्यांचा हितासाठी हवामानाचा अंदाज सांगून पावसामुळे शेतकऱ्यांचे होणार नुकसान टाळण्यासाठी व पुढील नियोजनासाठी सांगत आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीसाठी थोडे दिवस राहिले आहेत. त्यांनी लवकरात लवकर शेतीच्या मशागतीची कामे करून खरिपाच्या पेरणीसाठी सज्ज राहावे, असेही पंजाबराव डख म्हणाले.
शेतकऱ्यांचे मान्सूनकडे लक्ष...
यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे मान्सूनकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहेत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी खरीप हंगामात मोठ्याप्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं. त्यातून शेतकरी सावरत नाही तो, रब्बी हंगामात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. मार्च, एप्रिल ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे गेल्यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात काहीच आले नाही. विशेष म्हणजे काही शेतकऱ्यांचा पेरणीसाठी लावलेला खर्च देखील निघाला नाही. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला असला तरीही अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने येऊ नयेत अशीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
तापमान वाढतत आहे.
सध्या उन्हाचा पारा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून तापमान 41 अंशांवर गेले आहे. सोमवारी त्यात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता असून, तापमान 42 अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी
श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.
पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे
पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट
दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष