लिपिकाच्या नोकरीसाठी मागितली १३ लाखांची लाच; संस्थाचालकाविरोधात एसीबीची कारवाई

By : Polticalface Team ,22-05-2023

लिपिकाच्या नोकरीसाठी मागितली १३ लाखांची लाच; संस्थाचालकाविरोधात एसीबीची कारवाई मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): लिपिकपदाची मान्यता काढण्यासाठी १३ लाखांची लाचेची मागणी केली. ही लाच धनादेश आणि रोख स्वरूपात घेतली गेली. यानंतर प्रतिबंधक विभागाने तब्बल सहा महिन्यांनंतर संस्थाचालकासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला.

पांडुरंग दिगंबर भगनुरे, कांतीलाल बाबूलाल पांडे (रा. एन १२, हडको), विलास रामदासराव वाकोडे (रा. गादिया विहार) आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी भगनुरे आणि महिला ही चैतन्य शिक्षण संस्था संचालित रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, चिकलठाणा येथे राहतात. तक्रारदार राजू आसाराम बडवणे (४०, रा. न्यू हनुमाननगर) यांच्या मुलीला चैतन्य शिक्षण संस्थेच्या रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत लिपिकपदाची नोकरी देण्यासाठी आणि याबाबतची शिक्षण विभागाकडून मान्यता काढून देण्यासाठी १३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. ठरल्यानुसार १० डिसेंबर २०२२ रोजी संस्थेचे सचिव भगनुरे यांनी बडवणे यांच्याकडून पाच, पाच लाखांचे दोन धनादेश आणि तीन लाख रुपये रोख म्हणून (यात २ लाख ९० हजारांच्या बनावट नोटा व दहा हजारांच्या चलनी नोटा) घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. यावेळी पंचांसमक्ष आरोपींकडून ही रक्कम आणि धनादेश जप्त केले होते. मात्र, तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला नव्हता.

कायदेशीर सल्ल्यानंतर नोंदविला गुन्हा ही कारवाई केल्यानंतर ही खाजगी शिक्षण संस्था असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संस्थांचालकाविरोधात कारवाईचे अधिकार आहेत अथवा नाही, याविषयी पोलिस अधीक्षकांनी विधि सल्लागारांचा अहवाल मागितला होता. विधि सल्लागाराने यात कारवाईचे अधिकार एसीबीला असल्याचे नमूद केल्याने याप्रकरणी २० मे रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी सांगितले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न