छत्रपती संभाजीनगर कृउबाच्या सभापतीपदी राधाकिशन पठाडे
By : Polticalface Team ,22-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राधाकिशन पठाडे सभापती तर मुरलीधर अण्णा चौधरी उपसभापती विजयी झाले. विशेष म्हणजे, दोघांनी प्रत्येकी १४ विरुद्ध ४ मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीकडून सभापतीपदासाठी जगन्नाथ काळे तर मेहेंद्र खोतकर यांनी निवडणूक लढवली.
वाचक क्रमांक :