उन्हाचा पारा ४२ अंशांवर जाण्याची शक्यता? तापमानात दोन अंशांनी वाढ
By : Polticalface Team ,22-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
सध्या सूर्य चांगलाच तळपत असल्यामुळे कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत दोन अंशांनी वाढ होऊन गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा पारा ४१ अंशांवर गेले आहे. सोमवारी त्यात एक अंशाने वाढ होऊन पारा यंदा प्रथमच ४२ अंशांवर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.उष्णतेच्या झळांनी अंग पोळून निघत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
१८ मेपासून पुन्हा उसळी घेतली. गेल्या तीन दिवसांपासून तापमान ४१ अंशांवर गेल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. सोमवारी त्यात एक अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
तीव्र तापमान समुद्रावरून बाष्प खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
वाचक क्रमांक :