वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये सर्वाधिक ट्रिपलसीटधारकच?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,23-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाहतूक शाखेतर्फे गेल्या २१ दिवसांत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १० हजार ८८७ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक संख्या म्हणजे ४,०१० दंडवसुली ट्रिपलसीटधारकांची आहे. नियम माेडणाऱ्या वाहनचालकांकडून ४० लाख १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
दुसऱ्या क्रमांकावर विना हेल्मेट वाहन चालवणारे आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावर नियम तोडून राँग साइडने जाणारे वाहनधारक आहेत. १ मेपासून शहर वाहतूक खात्यातर्फे अभियान सुरू आहे. पोलिस आयुक्तालय, छत्रपती संभाजीनगर शहरांतर्गत शहर वाहतूक विभागातर्फे चौकाचौकांत ही विशेष मोहीम सुरू आहे. यात सर्वाधिक संख्या ट्रिपलसीट दुचाकीस्वारांची आहे. यात दररोज सरासरी १९० हून अधिक ट्रिपलसीटधारक पकडण्यात येत आहेत. त्यांच्याकडून एकूण ४० लाख १० हजारांची दंड वसुली करण्यात आली आहे, असे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दिलीप गांगुर्डे यांनी सांगितले.
वाचक क्रमांक :