दगडावर डोके आपटुन ५ जुन रोजी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार;भाऊसाहेब गवळी?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,23-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
गंगापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे भाऊसाहेब गवळी यांनी अशी मागणी केली आली आहे की, गंगापूर तालुक्यातील कायगाव, अंमळनेर, लखमापुरसह जामगाव सर्कलमध्ये राहिलेल्या गावाचे अनुदान तात्काळ देण्यात यावे; नसता आपल्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनासोबत घेउन दगडाला डोके आपटुन ५ जुन रोजी आत्मदहन करण्यात येईल. मागिल दोन तीन वर्षापासून अतिप्रमाणात पाउस येत आहे? त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन नकोसे झाले आहे व शेतकऱ्यांची अत्यंत वाईट परिस्थिती झालेली आहे. शेतकरी राजा फार संकटात आहे. मेहनतीसाठी,नांगरनी मशागतीसाठी, वीज भरणा करण्यासाठी कोणताही पर्याय नाही;त्यामुळे शेतकऱ्यांकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यासाठी आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ जुनच्या आधी अनुदानाचे पैसे टाकावे!नसता तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना सोबत घेऊन दगडाला डोके आपटुन ५ जुन रोजी आत्मदहन करण्यात येईल याची सर्वस्व जबादारी आपल्यावर राहील असे निवेदन भाऊसाहेब गवळी कायगाव यांनी तहसील कार्यालयात दिले आहे.
वाचक क्रमांक :