सईद पवार यांची जनशक्ती संघटनेच्या शहरअध्यक्षपदी निवड(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,23-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या आदेशानुसार छत्रपती संभाजीनगर व नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख अनिल शेळके पाटिल यांच्या हस्ते सईद पवार यांची जनशक्ती शेतकरी संघटना कन्नड शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी कन्नड तालुकाप्रमुख अशोक पाटील पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व संघटना वाढीसाठी कन्नड तालुक्यातील सर्वसामान्यांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण जनशक्ती शेतकरी संघटनेच्या शहरा मध्ये वार्ड तिथे शाखा स्थापन करुन सर्व सामान्यांसाठी काम करावे,अशी चर्चा या निवडी प्रसंगी झाली.
वाचक क्रमांक :