सिद्धापुर शिवारात वाघाचा संचार,वनविभागाने जेरबंद करण्याची आवश्यकता?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,23-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
गंगापूर तालूक्यातील सिद्धापुरवाडी येथे बाळासाहेब जाधव व अब्दुल चाऊस यांच्या शेत शिवारात अनेक दिवसांपासून गुरगुर आवाज ऊसात पाणी भरतानी येत होता, शेतकऱ्यांना वाटायचे रानडुक्कर आहे? पण हा आवाज वेगळा व पायाचे ठसे बघून शेतकऱ्यांच्या लक्ष्यात आले की, वाघाच्या पायाचे ठसे आहेत; वाघ जनावरांच्या पाठीमागे पळायला लागला शेत मोकळे झाल्यामुळे मुक्त संचार वाघ करत आहे. आज रात्री ट्रॅक्टरच्या मागे धावत आला; जनावरांच्या गोठ्ठया पर्यंत आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे शेतातील कामे बंद झाले आहे.सर्व ठिकाणी भीतीचे वातावरण तयार झालेले चित्र या गावात दिसून येत आहे,वनविभागाने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून वाघाला जेरबंद करावे अशी विनंती या वृत्तपत्रांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यानी केली आहे.
वाचक क्रमांक :