जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,24-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
जलजीवन मिशनच्या मार्फत हर घर नल हर घर जल! या योजनेतुन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यातील चोरवाघलगाव गावासाठी तब्बल एकविस लाख रुपये निधी मंजुर असलेले काम सुरू असुन सदरील काम हे गावातील व वाडीवस्तीवर संपुर्ण नवीन पाईपलाईन व नवीन नळ कनेक्शनची मंजुरी असतांनी देखील गावातील पाईपलाईन नवीन न बनवता सिमेंट व डांबरी रस्त्याची कारणे दाखवली जात आहे .पंचवीस ते तीस वर्षापुर्वी जूनी पाईपलाईन असलेली व झाडाच्या मुळ्या जाळ्या पसरलेली व जीर्ण झालेल्या पाईपलाईनला नवीन कनेक्शन वरचेवर जोडुन सदरील ठेकेदार ग्रामपंचायत कमिटी व संबधित अधिकाऱ्यांनी चाल ढकल करुन कागदोपञी काम दाखवत शासनाने गावासाठी पुरविलेला लाखो रुपयाचा निधी भरदिवसा हडप केला जातोय?यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार की डोळे झाकुन संमती देणार;याकडे गावाकऱ्यांचे लक्ष वेधले जात आहे!
वाचक क्रमांक :