कंपनी चालवायची असेल तर ४ कोटी द्या; उद्योजकास खंडणी मागणारा अटकेत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,24-05-2023

कंपनी चालवायची असेल तर ४ कोटी द्या; उद्योजकास खंडणी मागणारा अटकेत(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): पैठण एमआयडीसीतील एका कंपनीच्या अधिकारी, मालकाकडे चार कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ठगास ग्रामीण पोलिसांनी आज दुपारी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांच्याकडे कंपनी व्यवस्थापकाने तक्रार नोंदविल्यानंतर एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवित आरोपीस बेड्या ठोकून अटक केली.

विष्णु आसाराम बोडखे ( ५७, रा. सेंटपॉल मुधलवाडी, ता. पैठण ) असे आरोपीचे नाव आहे. पैठण एमआयडीसीतील नामांकित मॅट्रिक्स लाईफ सायन्स प्रा. लि. डी.८ या कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी अझरुद्दीन पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोडखे हा डिसेंबर २०२२ मध्ये त्यांना कंपनीत भेटला. तेव्हा त्याने कंपनी चालू द्यायची असेल तर १० लाख रुपये द्यावे, लागतील अशी धमकी दिली. पठाण ही माहिती कंपनीच्या मालकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. तेव्हा वरिष्ठांनी कंपनी नियमानुसार चालत असल्यामुळे पैसे द्यायचे नाहीत, असे स्पष्ट केले. त्यानंतर बोडखेने कंपनीच्या विरोधात विविध सरकारी कार्यालयामध्ये निवेदने दिली. त्यामुळे कंपनीची बदनामी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर फिर्यादीने बोडखेशी संपर्क साधला.

दोघातील चर्चेनंतर बोडखेला फिर्यादीने १ लाख ५० हजार रुपये दिले. दीड लाख मिळाल्यानंतर १५ दिवसांनी बोडखेने एवढ्या पैशात काहीच होत नाही, अजून पैसे द्यावे लागतील असे फोन करून फिर्यादीला सांगितले. तेव्हा त्यास फिर्यादीने आणखी पैसे भेटणार नाहीत, असे बजावले. त्यावर बोडखेने तुमचे पैसे परत घेऊन जा; असा निरोप दिला. त्यानुसार फिर्यादी पैसे आणण्यासाठी गेल्यावर बोडखेने १ लाख रुपये दिले. ५० हजार रुपये ठेवून घेतले. त्याचवेळी तुमची कंपनी कशी चालते हेच मी पाहतो अशी धमकी दिली. या घटनेनंतर बोडखेने विविध कार्यालयात पुन्हा निवेदनांचा भडिमार केला.

दरम्यान, १२ एप्रिल २०२३ रोजी तो दुपारी कंपनीत आला. फिर्यादीला भेटल्यानंतर त्यांनी कंपनी मालकाची भेट घालून दिली. तेव्हा बोडखेने त्यांच्याकडे ४ कोटी रुपये देण्याची मागणी केली. त्याशिवाय तात्काळ ५ लाख रुपये द्यावचे लागतील आणि प्रत्येक महिन्याला २० हजार रुपये हप्ताही द्यावा लागेल असे बजावले. याविषयीचे संभाषण कंपनीच्या कार्यालयवरील कॉलवर रेकॉर्ड झाले आहे. बोडखेच्या त्रासाला कंटाळून अखेर कंपनी व्यवस्थापनाने पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यावर कलवानिया यांनी तात्काळ खंडणीचा गुन्हा नोंदवित आरोपीस अटक केली. ही कारवाई कलवानिया यांच्या मार्गदर्शनात सपोनि भागवत नागरगोजे, उपनिरीक्षक दिलीप चौरे, राहुल मोहतमल, कृष्णा उगले, मिलींद घाटेश्वर यांनी केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.