सावंगीच्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराचे अडीच कोटी रुपये खर्चून होणार भूमिपूजन!(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,24-05-2023
मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ):
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांच्या मंदिराच्या नवीन मंदिराच्या कामाचा शुभारंभ व भूमिपूजन 27 मेला सायंकाळी पाच वाजता देवगड संस्थानचे महंत प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून, आ. प्रशांत बंब, आ. आंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला राहणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष अशोक म्हसू पवार, उपाध्यक्ष संजय पांडव,सचिव दादा तुळशीराम पवार यांनी संयुक्त पणे दिली आहे.
दरम्यान गंगापूर तालुक्यात भैरवनाथ बाबा नवसाला पावणारा देवा! अशी ख्याती आहे.त्यामुळे जिल्हाभरातून अनेक भाविक भक्त भैरवनाथ बाबाला नवस बोलतात नवस व मनोकामना पूर्ण झाल्यावर रोडगे व वरण यांचा महाप्रसाद करून नवस फेडण्याची परंपरा कित्येक वर्षांपासून अविरतपणे चालत आहे. मात्र नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांचे मंदिर हे फार प्राचीन होते.मात्र छोटे होते;सावंगीचे गावकरी यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक,नागरिक यांची खूप वर्षांपासून इच्छा होती की, याठिकाणी भव्य दिव्य असे भैरवनाथ बाबांचे मंदीर उभे राहावे!भाविकांची ती इच्छा आत्ता पूर्ण होणार असून; तब्बल अडीच कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभे राहणार असल्याने भाविकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रतिक्रिया :- मीनाताई संजय पांडव (सरपंच, लासूर स्टेशन) सावंगीचे भैरवनाथ बाबांचे देवस्थान नवसाला पावणारे असल्याने जिल्हाभरातून अनेक भाविक भक्त आपल्या मनातील इच्छा याठिकाणी येऊन नवस बोलतात व नवस पूर्ण झाल्यावर दरवर्षी भैरवनाथ बाबांच्या यात्रेला नवस फेडण्यास भविक सहकुटुंबं सहपरिवार येत असतात मात्र पूर्वीच्या लोकसंख्येनुसार जुन्या मंदिराची रचना आहे. मात्र आता भाविकांचा घ वाढल्याने मंदिर नवे व्हावे असे सर्व भाविक व गावकरी यांची इच्छा होती; त्यामुळे गावकऱ्यांनी ठरवल्याने भव्य दिव्य मंदिर सर्वांच्या सहकार्याने लवकरच उभारले जाईल.
अशोक म्हसू पवार (अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान समिती) गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे सावंगी येथील नवसाला पावणाऱ्या भैरवनाथ बाबांचे भव्य दिव्य मंदिर सावंगी, लासूर स्टेशन,दायगाव,भानवाडी गावाकऱ्यांच्या सह पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सहकार्याने उभारले जाईल नवसाला पावणारा देवा असल्याने भाविकांचा ओघ सध्या वाढत चालला आहे.त्यामुळे नवीन मंदिराची उभारणी होणे गरचेचे होते; भाविकांची ही स्वप्नपूर्ती लवकरच पूर्णत्वाला जाणार असून भाविक भक्तांनी मंदिराच्या बांधकामाला देणगी देऊन सढळ हाताने मदत करावी त्यासाठी 9822480980,8275527777,9890469712 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भाविकांना समितीचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.