श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या विद्यालयचा निकाल ९५.६५ टक्के(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,25-05-2023
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथील श्रीमती राजाबाई माधवलालजी धूत कन्या विद्यालय यांनी यशाची परंपरा कायम राखली असून, यंदा इयत्ता बारावीचा निकाल ९५.६५ टक्के लागला आहे.
विद्यालयातील विद्यार्थिनी
कु. मुस्कान अनवर शेख या विद्यार्थिनीने ९०.६६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर
कु.इराम शाकीर शेख या विद्यार्थिनीने ८८.३३ % तर
कु. पवार ज्ञानेश्वरी संतोष या विद्यार्थिनीने ८७.67 % गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय एवं तृतीय क्रमांक मिळवले .
विद्यालातील एकूण ४६ पैकी ४४ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून त्यापैकी १४ विद्यार्थिनी विशेष प्राविण्य २२ विद्यार्थिनी प्रथमश्रेणी तर 8 विद्यार्थिनीने द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.
परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षिकांचे तसेच त्यांना मार्गदर्शन एवं प्रोत्साहन देणाऱ्या पर्यवेक्षिका श्रीमती वि.वि.शास्त्री एवं प्राचार्या श्रीमती बेंद्रे एस.बी. यांचे संस्थेचे पदाधिकारी मा.खा.श्री.राजकुमारजी धूत , श्री अक्षयजी धूत शालेय समितीचे अध्यक्ष श्री सुशीलकुमार मंत्री तसेच सदस्य श्रीमती तृप्ती सुशीलकुमार मंत्री, श्री प्रविणकुमार सोमाणी,ॲड. दिनकरराव देशपांडे ,सुकुमार मंत्री ,संतोष भालेराव, राजेंद्र सरोवर यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :