अतिवृष्टीचे अनुदान वाटप न झाल्यास शेतकरी करतील आत्मदहन?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,25-05-2023
अतिवृष्टी अनुदान जर लवकरात लवकर पूर्ण शेतकऱ्यांना वाटप न केल्यास येत्या 11 जून 2023 रोजी अर्जुन किसन पवार व गंगापुर तालुक्यातील शेतकरी तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत;असे निवेदन तहसील कार्यालयात देण्यात आलेले आहे.याचे प्रमुख कारण आता पेरणीचा टाईम आला आहे; पेरणीसाठी शेतकऱ्यांना पैशाची खूप गरज आहे आणि कापूस कवडीमोल भावात विकावा लागला.कांदे पूर्ण सडले आहेत; कांद्यांनाही कवडीमोल भाव आहे, उसानेही यंदा अवरेज दिले नाही; म्हणजे प्रत्येक पिकात शेतकऱ्यांना केलेला खर्चही मिळाला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये अनुदान अजूनही कित्येक शेतकऱ्यांना मिळाले नाही.पिक विमाही मिळाला नाही; शेतकऱ्यांसाठी एवढ्या अटी आणि एवढा विचार कशासाठी म्हणून याचा संबंधित अधिकाऱ्यांनी विचार करावा.
वाचक क्रमांक :