चितेगाव येथे महाराष्ट्र नागरी पतसंस्थेच्या शाखेचे उद्घाटन संपन्न(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,25-05-2023
दिनांक २५.०५.२०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मधील चितेगाव येथे महाराष्ट्र नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेचा उदघाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या पतसंस्थेचा व्यवहार बिडकीन येथे पारदर्शी असून पतसंस्थेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सर्व कर्मचारी वर्ग ग्राहकांना नम्रपणे व नागरिक आणि ग्राहक यांच्या हितसंबंधाचे व्यवहार करतात म्हणूनच चितेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांची बऱ्याच दिवसापासून मागणी होती ती पूर्ण झाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तमिजोदीन इनामदार यांनी संस्थेच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पैठण तालुकाप्रमुख मनोज भाऊ पेरे, अध्यक्ष डॉक्टर जंगले साहेब, उपाध्यक्ष विकास भाऊ गोरडे, संचालक मनोज भाऊ मंडलिक चितेगाव व पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :