तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकले अर्भक; पोलिसात गुन्हा दाखल

By : Polticalface Team ,27-05-2023

तोंडात बोळा कोंबून झुडपात फेकले अर्भक; पोलिसात गुन्हा दाखल मराठवाडा विभागीय (प्रतिनिधी योगेश मोरे ): छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरीबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आले. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यावर गुरुवारी (दि. 26 मे) हा प्रकार समोर आला. शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळील ही घटना असून, बाळाची प्रकृती ठीक असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. तर बाळाला फेकून देणाऱ्या अज्ञात माता-पित्यांविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून आरोप आई-वडिलांचं शोध घेतला जात आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंमलदार विलास चव्हाण फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात 25 मे रोजी ते चालक अनिल पवार ड्युटीवर होते. दरम्यान त्यांना कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिराजवळील झुडपामध्ये एक बाळ रडत असल्याचा कॉल आला. त्यांमुळे चव्हाण यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तेथे दोन महिला हजर होत्या. त्यांपैकी एकीच्या हातात पाच ते सात दिवसांचे पुरुष अर्भक होते. अधिक माहिती घेतल्यावर हे अर्भक येथील झुडपात फेकून दिल्याचे आढळल्याचे महिलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अर्भकाला घाटीत दाखल केले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणाचा अधिक तपास सहायक निरीक्षक डॉ. विशाल इंगळे करीत आहेत.

आरोपींचं पोलिसांकडून शोध सुरु शहरातील कोटला कॉलनी रोडवरील शनि मंदिर- जवळ अवघ्या पाच ते सात दिवसांच्या मुलाच्या (अर्भक) तोंडात बोळा कोंबून आणि कॅरिबॅगमध्ये गुंडाळून झुडपात फेकून देण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या बालकाच्या आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शनि मंदिराजवळील झुडपात कॅरिबॅगमध्ये गुंडाळलेले अर्भक टाकण्यासाठी नेमके कोण आले असेल? याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एक महिला पिशवी घेऊन आली होती. जाताना तिच्याकडे पिशवी नव्हती, अशी माहिती त्या भागातील लोकांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहे.

बाल कल्याण समितीचे आवाहन...
नको असलेले मूल असे फेकून देणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे पालकांनी गुन्हेगार बनू नये. असे अर्भक बालकल्याण समितीकडे आणून द्यावे. त्यांची नावे गुप्त ठेवली जातील. हे बाळ शिशुगृहात ठेवून त्याचे पालन-पोषण केले जाते. योग्य वेळी ते बाळ दत्तक दिले जाते. त्यामुळे बाळाचे भविष्य घडते, असे आवाहन बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा ॲड. आशा शेरखाने-कटके यांनी केले आहेत.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न