न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगाव येथे आरती जोशी बारावीतून प्रथम(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,27-05-2023
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय ढोरेगावचा कला शाखेचा निकाल ९४.२३% लागला आहे.
सालाबाद प्रमाणे या वर्षी कला शाखेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. यात प्रथम क्रमांक कु. आरती नंदलाल जोशी =७७.८३%
द्वितीय क्रमांक कु. अक्षरा विजय खंडागळे =७०.३३% तर तृतीय क्रमांक चि.कार्तिक शिवाजी काळे =६९.१७% या विद्यार्थ्यांनी मिळाला आहे. बारावीच्या सर्व पास विद्यार्थ्यांचे अभिनंदन शालेय समिती अध्यक्ष श्री आयुब पटेल ,विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब फसले ,उच्च माध्यमिक शिक्षक अविनाश मिसाळ ,श्रीमती शितल शेवाळकर, योगेश फुलारे विद्यालयाचे शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
प्रतिक्रिया
माझा बारावीत पहिला नंबर आला मला खूप आनंद झाला आहे;त्यासाठी मला खूप अभ्यास करावा लागला. मला आमच्या सरांनी मॅडमनी खूप छान प्रकारे सपोर्ट केलेला होता! मी याचं पूर्ण श्रेय माझ्या शिक्षकांना देईन कारण ते आमच्याकडून खूप छान प्रकारे अभ्यास करून घेत होते आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगायचे मला जर काही समजलं नाही तर मी पुन्हा विचारायचे आणि सर आम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगत होते. आणि त्यांनी आमची पेपरची सुद्धा तयारी चांगल्या प्रकारे करून घेतली होती
(कु.आरती नंदलाल जोशी विद्यार्थीनी)
वाचक क्रमांक :