वन ऑफिसर, वन नंबर! अधिकारी बदलला तरीही पोलीस ठाण्याचा नंबर तोच राहणार(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)

By : Polticalface Team ,28-05-2023

वन ऑफिसर, वन नंबर! अधिकारी बदलला तरीही पोलीस ठाण्याचा नंबर तोच राहणार(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारताच वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या आहेत. पोलीस नागरिकांचा संवाद राहण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. अशातच त्यांनी वन युनिट,वन ऑफिसर आणि वन मोबाईल नंबर!अशी अभिनव योजना सुरु केली आहे. यासाठी प्रत्येक विभाग आणि पोलीस ठाण्यासाठी एक विशेष मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ज्यात पोलीस अधिकारी किंवा पोलीस ठाण्याचे प्रमुख बदलले तरीही त्या पोलीस ठाण्याचा मोबाईल क्रमांक मात्र कायमस्वरूपी एकच असणार आहे. तर शहर पोलीस दलातील सर्वच विभाग आणि पोलीस ठाण्याचे मोबाईल नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत. अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीसांना तात्काळ माहिती कळविणेकरीता अवधी लागतो. सर्व सामान्य जनतेने पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला तर प्रतिसाद मिळत नाही किंवा ते मोबाईलवर प्रतिसाद देत नाही. तसेच पोलीस स्टेशन किंवा शाखेतील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यानंतर सदर ठिकाणी नवीन बदलून आलेल्या पोलीस अधिकारी यांना त्या विभाग किंवा परीसरातील लोकप्रतीनिधी, सामान्य जनता, गुप्त बातमीदार, पोलीस मित्र यांच्याशी संपर्क होण्याकरिता अडथळा निर्माण होतो. नवीन अधिकारी यांचा जनतेशी संपर्क होईपर्यत महत्वाचा वेळ वाया जातो. त्यामुळे पोलीस अधिकारी व जनतेतील "सुसंवादात होणारा हा महत्वाचा अडथळा दूर करण्यासाठी वन युनिट,वन ऑफिसर आणि वन मोबाईल नंबर ही संकल्पना येत्या एक जूनपासून छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त लोहिया यांनी दिली आहे. तसेच पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी यांची बदली झाल्यास त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी पदभार सोडतांना, पदभार स्वीकारणारे अधिकारी यांना देणे बंधनकारक राहणार असून शासकीय अभिलेखी त्याची नोंद असणार आहे. तसेच पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी याबाबत आदेश काढले असून, सदरचे मोबाईल नंबर सर्व पोलीस स्टेशन आणि शाखा येथील शहरवासीयांना माहिती व्हावेत याकरीता नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेले मोबाईल नंबर... मा. पोलीस आयुक्त सो : 9226514001 पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) : 9226514002 पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 01) : 9226514003 पोलीस उप आयुक्त (परिमंडळ 02) : 9226514004 सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा : 9226514005 सहायक पोलीस आयुक्त, प्रशासन : 9226514006 सहायक पोलीस आयुक्त, विशेष शाखा : 9226514007 सहायक पोलीस आयुक्त, शहर विभाग : 9226514008 सहायक पोलीस आयुक्त, छावणी विभाग : 9226514009 सहायक पोलीस आयुक्त, सिडको विभाग : 9226514010 सहायक पोलीस आयुक्त, उस्मानपुरा विभाग : 9226514011 सहायक पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा : 9226514012 पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष : 9226514013 पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा : 9226514014 पोलीस निरीक्षक, विशेष शाखा : 9226514015 पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा : 9226514016 पोलीस निरीक्षक पो.स्टे. सायबर : 9226514017 पोलीस निरीक्षक, सुरक्षा विभाग : 9226514018 पोलीस निरीक्षक, बॉम्ब शोधक व नाशक पथक : 9226514019 पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण विभाग : 9226514020 पोलीस निरीक्षक, हायकोर्ट सुरक्षा : 9226514021 पोलीस निरीक्षक, वाचक शाखा : 9226514022 पोलीस निरीक्षक, भरोसा सेल (महिला सहाय्यता कक्ष): 9226514023 पोलीस निरीक्षक, पो.स्टे. सिटी चौक : 9226514024 पोलीस निरीक्षक, पो.स्टे. क्रांतीचौक: 9226514025 पोलीस निरीक्षक पो.स्टे. छावणी : 9226514026 पोलीस निरीक्षक पो.स्टे. वाळुज : 9226514027 पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम वाळुज : 9226514028 पोलीस निरीक्षक पो.स्टे. बेगमपुरा : 9226514029 पोलीस निरीक्षक पो.स्टे. दौलताबाद: 9226514030 पोलीस निरीक्षक पो.स्टे. वेदांतनगर : 9226514031 पोलीस निरीक्षक पो.स्टे. सिडको: 9226514032 पोलीस निरीक्षक पो.स्टे. जिन्सी: 9226514033 पोलीस निरीक्षक पो.स्टे. जवाहरनगर : 9226514034 पोलीस निरीक्षक पो.स्टे. एम सिडको : 9226514035 पोलीस निरीक्षक पो.स्टे. मुकुंदवाडी: 9226514036 पोलीस निरीक्षक पो.स्टे. उस्मानपुरा: 9226514037 पोलीस निरीक्षक पो.स्टे. सातारा: 9226514038 पोलीस निरीक्षक पो.स्टे. हर्सुल: 9226514039 पोलीस निरीक्षक पो.स्टे. पुंडलीकनगर : 9226514040 पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग 1 : 9226514041 पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, शहर विभाग 2 : 9226514042 पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, सिडको विभाग : 9226514043 पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, छावणी विभाग: 9226514044 पोलीस निरीक्षक, वाहतुक शाखा, वाळुज विभाग: 9226514045 पोलीस निरीक्षक, दंगा काबू : 9226514046 कोर्ट मॉनटरींग सेल (पैरवी अधिकारी) : 9226514047 पोलीस निरीक्षक, मनपा अतिक्रमण हटाव पथक : 9226514048 पोलीस निरीक्षक मोटार परिवहन विभाग : 9226514049 पोलीस निरीक्षक बिनतारी संदेश विभाग : 9226514050
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौंड नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा जोरदार. मी कामाचा माणूस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार.

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न