मनीमाऊची महापालिकेत नोंदणी करणे बंधनकारक?(योगेश मोरे, मराठवाडा विभागीय प्रतिनिधी)
By : Polticalface Team ,29-05-2023
शहरात श्वान, मांजरप्रेमींची संख्या झपाट्याने वाढत आहे. विदेशातील विविध प्रजातींचे श्वान शहरात आणले जात आहेत. परदेशियन मांजरींची क्रेझही शहरवासीयात वाढू लागली. त्यामुळे आता मांजरीचीही मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक राहणार आहे. प्राण्यांवर औषधोपचार करण्यासाठी महापालिकेची मोबाईल व्हॅन तूमच्या घरी येईल, त्यासाठी ठरावीक शुल्क नागरिकांकडून वसूल केले जातील, अशी माहिती प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिली.
महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाकडून मागील अनेक वर्षांपासून श्वान परवाना देण्यात येतो. ७५० पेक्षा अधिक नागरिकांनी श्वान परवाना घेतला. मात्र, नूतणीकरणासाठी अत्यल्प नागरिक येतात. दरवर्षी परवाना नूतणीकरण करणे बंधनकारक आहे. मनपाच्या मध्यवर्ती जकात नाका येथील प्राण्यांच्या रुग्णालयात नागरिक पाळीव प्राणी घेऊन येतात. त्यांच्यावर मनपाकडून उपचारही केले जातात. शहरात श्वानप्रेमी आणि मांजरप्रेमींची संख्या झपाट्याने वाढू लागली. प्राण्यांना रेबीजसह अन्य इंजेक्शन द्यावे लागतात. बहुतांश नागरिक आपल्या घरातील सदस्याप्रमाणे पाळीव प्राण्यांना जीव लावतात. त्यांना किंचितही त्रास होऊ लागला तर खासगी डॉक्टर, मनपा रुग्णालय, खडकेश्वर येथील शासकीय दवाखान्यात घेऊन जातात.
प्राणीप्रेमींची वाढती संख्या लक्षात घेता त्यांना विविध सोयी सुविधा देण्याचा विचारही मनपा प्रशासनाने सुरू केला असून, त्याचाच एक भाग म्हणून एक मोबाईल व्हॅन तैनात केली जाणार आहे. नागरिकांनी मोबाईल केल्यानंतर दारावर व्हॅन येईल. तूमच्या लाडक्या प्राण्यावर औषधोपचार करून निघून जाईल. त्यासाठी ठराविक रक्कम वसूल केली जाईल, अशी माहिती जी. श्रीकांत यांनी दिली. राज्यातील काही महापालिका घरातील कोणत्याही पाळीव प्राण्याची नोंद करतात. त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर मनपाही मांजरींची नोंदणी करणार आहे. लवकरच यासंदर्भातील तपशील जाहीर केला जाणार आहे.
श्वान परवाना तपशील
नवीन नोंदणी- ७५० रुपये
नूतनीकरण (३१मे)- ५०० रुपये
नूतनीकरण (३१ मे नंतर) - ७५० रुपये
श्वान पकडून आणला तर दंड - ७५० रुपये
२०२२-२३ मधील नोंदणी
नवीन परवाना- १९४
नूतनीकरण- १४२
वाचक क्रमांक :
योगेश तुळशीराम मोरे
मराठवाडा विभाग प्रतिनिधी
जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.
अखेर लिंपणगाव ते श्रीगोंदा रेल्वे स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण सुरू वाहनचालक व प्रवाशांना मोठा दिलासा
ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
सोलापूर स्मार्ट सिटीचे प्रमुख अधिकारी गोपिचंद कदम यांचा तुळजा भवानी भोपे पुजारी समितीच्या वतीने केला सन्मान.
रमाई आवास घरकुल योजनेसाठी शासनाचे अनुदान १ लाख २० हजारात होत नाही घरकुल ? २ लाख ५० हजार अनुदानाची मागणी.
चार अपत्य असल्याने गुंडेगाव ग्रामपंचायत सदस्य अपात्र , जिल्हाधिकारी यांचा आदेश
मूक नायक या वृत्तपत्रांचा स्थापन दिन.आणि संघ नायक न्यूज. वर्धापन दिनानिमित्त सासवड येथे १३ जानेवारीला भव्य गौरव पुरस्कार सोहळा.
व्यंकनाथ विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली कापसे हिचा तालुकास्तरीय.विज्ञान प्रदर्शन व वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात वाचन कौशल्य कार्यशाळेचे यशस्वी आयोजन
जगण्याची व्यथा म्हणजे कथा - प्रसिद्ध कथाकार सुरेंद्र गुजराथी
रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.
लेखक हा संघर्ष व संवेदनशीलतेतून निर्माण होतो,मात्र लिहिण्याची प्रेरणा वाचनातूनच मिळते.- डॉ. बाळासाहेब बळे
ध्येयवादी पत्रकारिता सध्या राहिली नसून सत्ताधारी लोकांच्या हातातलं बाहुले बनली आहे. डिजिटल मिडीयाच्या दबावामुळे तरी पत्रकारिता तगून राहील जेष्ठ पत्रकार दशरथ यादव
आवाटी येथील ज्येष्ठ नागरिक आदम शेख यांचे निधन
के. पी. जाधव कॉलेजमध्ये १५ वे वार्षिक स्नेहसंमेलन व साई भूषण पुरस्कार उत्साहात संपन्न
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सह सा. का. ची पहिली उचल २८०० रुपये.
स्वभिमानी मराठा महासंघाच्या पहिल्या अधिवेशनाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात, राज्य निरीक्षक भानुदास वाबळे स्वभिमानी मराठा महासंघ भारत
विद्यार्थ्यांनी आनंदी बाजारातून व्यावहारिक ज्ञान आत्मसात करावे --निरीक्षक सचिनराव लगड
छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर कार्यशाळा संपन्न.
दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे मलठण येथे गावठी हातभट्टी दारु अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.